स्फोटानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसरात हादरे बसले. स्फोटानंतर परिसरात दहशतीचं वातावरण होतं. क्वेटा अत्यंत संवेदनशील परिसर मानला जातो. तिथे घुसून थेट हल्ला करणं ही पाकिस्तानला हादरवून टाकण्यासारखी स्थिती आहे. या स्फोटानंतर आजूबाजूच्या इमारतींना मोठे हादरे बसले. खिडक्या दरवाजे तुटले. पाकिस्तानची न्यूज वेबसाईट डॉनने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण गंभीर जखमी आहेत.
advertisement
स्फोटाची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्याचं काम सुरू आहे. परिस्थिती खूप भीषण आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बीएमसी आणि ट्रॉम सेंटर इथे आपात्कालीनची घोषणा करण्यात आली आहे. नर्स, पॅरामेडिकल, डॉक्टर यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. स्फोटानंतर परिसरात धुराचे मोठे लोळ दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. सुरक्षा दलाकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.