तीन ठिकाणी ड्रोन हल्ले
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने पक्तिका-दक्षिण वझिरिस्तान सीमेवरील तीन ठिकाणी ड्रोन हल्ले केले. टोलो न्यूजनुसार, एका हल्ल्यात नागरिकांच्या घरांना आणि दोन अफगाण तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.
अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्ताकडून अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई हल्ला करण्यात आला. काबुलमधल्या या हल्ल्याची जबाबदारी तहरीक -ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेनं स्वीकारली. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तानच्या काबूलमधील हवाई हल्ल्यानंतर अफगाण सैन्याने डुरंड सीमारेषेवरील (पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा) पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला, तसंच अफगाण सैन्याने काही पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 11:22 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानने आगीत हात घातला, शस्त्रसंधीनंतर मुनीरची घोडचूक, अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक