फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप मिंडानाओ येथील दावाओ ओरिएंटल प्रांतातील मनाय शहराच्या किनाऱ्यापासून समुद्रात 10 किलोमीटर खोलवर त्याचा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जात आहे.
3 मीटर उंचीच्या लाटांची शक्यता
संस्थेने भूकंपाच्या धक्क्यामुळे संभाव्य नुकसान आणि भूकंपाचे आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता वर्तवली आहे. 'फिव्होल्क्स'ने मध्य आणि दक्षिण फिलिपिन्सच्या किनारपट्टीवरील रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून त्वरित उंच ठिकाणी किंवा आणखी आतल्या भागांत जाण्याचे आवाहन केले आहे. हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने भूकंपाच्या केंद्रस्थानापासून सुमारे १८६ मैलांच्या परिसरात धोकादायक लाटा उसळू शकतात, असा इशारा दिला आहे.
advertisement
फिलिपिन्सच्या किनारपट्टीच्या काही भागांमध्ये ३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर इंडोनेशिया आणि पलाऊमध्ये लहान लाटांची अपेक्षा आहे. खबरदारी म्हणून, इंडोनेशियामध्येही त्यांच्या उत्तर सुलावेसी आणि पापुआ प्रदेशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
इमारतींच्या नुकसान गरिकांमध्ये भीती
दक्षिण फिलिपिन्स प्रांताचे गव्हर्नर एडविन जुबाहिब यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, भूकंप होताच लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती आणि हा धक्का खूप शक्तिशाली होता. काही इमारतींना नुकसान झाल्याचे वृत्त आहे, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
या भूकंपादरम्यान लोकांमध्ये असलेली भीती आणि गोंधळ दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. दावाओ हॉस्पिटलमधील एका व्हिडिओमध्ये रुग्ण आणि कर्मचारी भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान आपले प्राण वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. आजचा हा शक्तिशाली भूकंप फिलिपिन्ससाठी मोठा धक्का आहे, कारण अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच सेबू येथे झालेल्या भूकंपात ७२ लोक मारले गेले होते, जो मागील दशकातील सर्वात मोठा भूकंप होता.