अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र, मात्र त्यांनी जे केलं ते मला आवडलं नाही. ते जे करत आहेत ते भारताच्या हिताचे आहे असं मला वाटत नाही असंही ट्रम्प सांगायला विसरले नाहीत. ट्रम्प यांनी टॅरिफच्या तणावानंतर थोडी नरमाईची भूमिका घेतल्यानंतर पीएम मोदी यांनी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं.
advertisement
अमेरिका आणि भारतामध्ये बराच काळ टॅरिफ वॉरवरून वाद सुरू होता. या काळात भारताने जाणीवपूर्वक कूटनीति करत ठेवली आणि संयमाने वागण्याची नीती स्वीकारली. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. अमेरिकेने वारंवार भारताला उकसवलं, तरी भारताने शांत राहून फक्त गरज पडेल तिथेच संतुलित उत्तर दिलं. पण, इशार्यांमध्ये भारताने ट्रंप प्रशासनाला कडक संदेश द्यायलाही कमी केलं नाही. आता या धोरणामुळे तणाव कमी होतोय आणि दोन्ही देशांमधील तणाव कमी होताना दिसत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आणि त्यांना आपला मित्र म्हटलं. ट्रंप म्हणाले, भारत आणि अमेरिकेमध्ये खास नातं आहे, काळजीचं कारण नाही. त्यावर मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की, मी ट्रंप यांच्या भावना आणि भारत-अमेरिका संबंधांबाबतच्या त्यांच्या सकारात्मक मताचं मनापासून स्वागत करतो. आपली भागीदारी जागतिक स्तरावर खूप मोठी आणि भविष्याकडे पाहणारी आहे.
सत्तेत परतल्यानंतर ट्रम्प यांचा आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यांनी असे अनेक निर्णय़ घेतले ज्याचा फटका थेट किंवा नकळतपणे भारतावर होणारा होता. टॅरिफ हा त्यांचा निवडणुकीचा आणि परराष्ट्र धोरणाचा मोठा मुद्दा आहे.
ट्रम्पची नाराजी का?
दोन महत्त्वाची कारण आहेत. ट्रेड डीलवर सहमती न झाल्याने त्यांनी भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावला. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली, म्हणून आणखी 25% शुल्क वाढवलं. म्हणजे एकूण 50% टॅरिफ. तरी भारत शांत राहिला आणि वाद वाढवला नाही.
सर्वात मोठं दुखणं म्हणजे चीनमध्ये झालेल्या SCO शिखर परिषदेतील फोटो. त्या फोटोत मोदी, चीनचे जिनपिंग आणि रशियाचे पुतिन एकत्र दिसले. ही गोष्ट ट्रम्प यांना चांगलीच खटकली. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावरर लिहिलं, भारत आणि रशिया चीनच्या जवळ गेलेत असं दिसतं. त्यांचं भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध होणार आहे. पण काही तासांतच व्हाईट हाऊस मधून त्यांनी अगदी उलट बोलून सांगितलं की, भारत आणि अमेरिका यांच्यातील नातं खास आहे, काळजीचं कारण नाही. अशा गोष्टी कधी कधी घडतात. धमक्या आणि आक्रमक विधानं करून भारत झुकणार नाही. जर भारत झुकला असता, तर त्याचे परिणाम आधीच दिसले असते. त्यामुळे आता ते पुन्हा मैत्री आणि भागीदारीसाठी मैत्रीपूर्ण संबंधांची भाषा करताना दिसले.