TRENDING:

पाकिस्तानच्या राजधानीत महाभयंकर स्फोट, नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्ला; 31 ठार, 169हून अधिक जखमी; मशिदीत मृतदेहांचा खच

Last Updated:

Powerful Blast In Islamabad: इस्लामाबादमधील तरलाई इमाम बारगाह परिसरात झालेल्या स्फोटामुळे राजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संपूर्ण शहरात तात्पुरती आणीबाणी लागू करत सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या तरलाई इमाम बारगाह परिसरात झालेल्या स्फोटात 31 जण ठार तर 169 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट शहजाद टाउन भागातील इमाम बारगाहमध्ये झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.  परिस्थिती गंभीर असल्याने संपूर्ण इस्लामाबादमध्ये तात्पुरती आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी इमाम बारगाह आणि आसपासचा परिसर सील केला असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू आहे.

परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता, इस्लामाबादमधील पॉलिक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. PIMSच्या कार्यकारी संचालकांच्या आदेशानुसार रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिल्याचे वृत्त Dawnने दिले आहे. हा हल्ला उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या दोन दिवसीय अधिकृत भेटीदरम्यान झाला आहे.

advertisement

मुख्य आपत्कालीन विभागासह ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांना PIMS आणि पॉलिक्लिनिक रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

advertisement

महत्त्वाचं म्हणजे, इस्लामाबादमध्ये ही घटना घडण्याआधीच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 11 नोव्हेंबर 2025 रोजी G-11 परिसरातील जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर आत्मघाती स्फोट झाला होता. त्या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

सध्याची घटना अद्याप तपासाच्या टप्प्यात असून, अधिकृत यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे. परिस्थिती जसजशी स्पष्ट होईल, तसतशी अधिकृत अपडेट्स दिल्या जातील. प्राथमिक वृत्तांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने, विश्वासार्ह स्रोतांच्या आधारेच माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानच्या राजधानीत महाभयंकर स्फोट, नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्ला; 31 ठार, 169हून अधिक जखमी; मशिदीत मृतदेहांचा खच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल