TRENDING:

इराणमध्ये मध्यरात्री आंदोलनाचा भडका, 50 शहरात निदर्शनं, 39 जणांचा मृत्यू, ट्रम्प यांच्याकडून सरकारला वॉर्निंग

Last Updated:

इराणमध्ये मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी रॅली काढत सरकारचा निषेध केला. जवळपास ५० शहरांमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

इराणमध्ये मागील दोन आठवड्यांपासून चलन घसरणीविरोधात निदर्शनं सुरू आहेत. गुरुवारी रात्री निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी लोकांना घराबाहेर पडून इस्लामिक रिपब्लिकविरुद्ध अर्थात इराणी सरकारचा निषेध करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर इराणमध्ये तीव्र निदर्शनं झाली आहेत. रेझा पहलवी यांच्या आवाहनानंतर, मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी रॅली काढत सरकारचा निषेध केला. दरम्यान, सरकारने आंदोलकांना हटवण्यासाठी सुरक्षा दल तैनात केलं आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील किमान ५० शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. आंदोलनाने उग्र रुप धारण केल्यानंतर सरकारने इंटरनेट आणि टेलिफोन लाईन कापल्या आहेत. लोक रस्त्यावर उतरून इराणी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, निदर्शनांमध्ये रेझा पहलवीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात आहे. आतापर्यंत पहलवीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जात होती.

advertisement

अमेरिकास्थित ह्युमन राइट्स अॅक्टीविस्ट वृत्तसंस्थेच्या मते, निदर्शनांमधील हिंसाचारात आतापर्यंत किमान ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २,२६० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी जनतेला पाठिंबा दर्शवत इराणी सरकारला थेट इशारा दिला आहे. जर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

advertisement

निदर्शने अचानक हिंसक कशी झाली?

१९७९ च्या इस्लामिक क्रांतीच्या अगदी आधी इराणचे तत्कालीन शाह मोहम्मद रझा पहलवी अमेरिकेत पळून गेले. त्यांचा मुलगा, क्राउन प्रिन्स रझा पहलवी अजूनही अमेरिकेत निर्वासित आहे. २८ डिसेंबर रोजी राजधानी तेहरानमधील दुकानदारांनी डॉलरच्या तुलनेत इराणी रियालच्या घसरत्या मूल्याविरुद्ध रस्त्यावर निदर्शने सुरू केली होती. त्यानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली.

दरम्यान, निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांनी लोकांना रस्त्यावर उतरून इस्लामिक रिपब्लिकविरुद्ध निषेध करण्याचे आवाहन केले. एका निवेदनात, पहलवी म्हणाले, "जग इराणकडे पाहत आहे. रस्त्यावर उतरा आणि एकत्र या आणि तुमच्या मागण्या जोरदारपणे मांडा. मी इस्लामिक रिपब्लिक, त्याचे नेते आणि क्रांतिकारी गार्ड यांना इशारा देतो की जग आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लोकांवरील अत्याचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल." स्थानिकांनी सांगितले की पहलवीच्या आवाहनानंतर, गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून लोक रस्त्यावर उतरले. निदर्शकांनी "हुकूमशाही मुर्दाबाद " आणि "इस्लामिक रिपब्लिक मुर्दाबाद" अशा आशयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

इंटरनेट बंद, अनेक ठिकाणी हिंसाचार

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून, इराणी सरकारने इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. टेलिफोन लाईन्स कापल्या आहेत. इंटरनेट मॉनिटरिंग ग्रुप नेटब्लॉक्सने सांगितले की लाईव्ह डेटावरून असं दिसून आलं आहे की अनेक ऑनलाईन सेवांची कनेक्टिव्हिटी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे देशातील अनेक भाग ऑफलाइन झाले आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
इराणमध्ये मध्यरात्री आंदोलनाचा भडका, 50 शहरात निदर्शनं, 39 जणांचा मृत्यू, ट्रम्प यांच्याकडून सरकारला वॉर्निंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल