रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कतारने म्हटले आहे की युद्धबंदी शाश्वत आणि योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी येत्या काही दिवसांत अधिक बैठका घेण्याचे मान्य केले आहे. या चर्चा अलीकडच्या सीमा युद्धानंतर झाल्या आहेत. ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. २०२१ मध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर दोन्ही शेजारील देशांमधील हा सर्वात मोठा संघर्ष आहे.
advertisement
अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले की काबुल शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री मुल्ला मुहम्मद याकूब यांनी केले होते, तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबान प्रतिनिधींसोबतच्या चर्चेत भाग घेतला होता.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट अफगाणिस्तानातून पाकिस्तानमध्ये होणारा सीमापार दहशतवाद थांबवणे आणि पाक-अफगाण सीमेवर शांतता आणि स्थिरता निर्माण करणं हे होते. अफगाणिस्तानने सीमेपलीकडून पाकिस्तानमध्ये केले जाणारे दहशतवादी हल्ले थांबवावेत, अशी मागणी पाकिस्तानने केले होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील हिंसाचार उफाळून आला.
तालिबानने दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इन्कार केला आहे. तसेच अफगाणिस्तानने पाकिस्तानवर गंभीर आरोप केला आहे. अफगाणिस्तानला अस्थिर करण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्याचा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांना पाठिंबा देण्याचा आरोप पाकिस्तानवर केला आहे. तथापि, पाकिस्तान हे आरोप फेटाळून लावले. सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवाद्यांनी सरकार उलथवून पाकिस्तानमध्ये कठोर इस्लामिक राजवट लागू करण्याचा कट रचला आहे, असा आरोप केला.