रशियातील कामचटका येथे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.७ इतकी मोजण्यात आली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंप समुद्राखाली झाला, त्यानंतर त्सुनामीचा धोकाही आहे. अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र घरांचं आणि दुकानांचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपान हवामान संस्थेने म्हटले आहे की सुमारे १ मीटर उंचीच्या लाटा जपानच्या किनारी भागात पोहोचू शकतात.
हे ही वाचा: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले रशिया ते जपान, 8.7 रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. सरकारने आपत्कालीन बैठकही बोलावली आहे, ज्यामध्ये मदत आणि बचाव कार्यांवर चर्चा करण्यात आली. यासाठी देशात तयारी देखील सुरू झाली आहे.
रशियामध्ये 8.8 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इमारतींना मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. कुरिल आइसलँड भागात समुद्राच्या उंच लाटा आल्यानं मोठं नुकसान झालं. कामचटका प्रायद्वीप परिसरात 8.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली होती.
जपानच्या NHK टेलिव्हिजननुसार, भूकंप जपानच्या चार मोठ्या बेटांपैकी सर्वात उत्तरेकडील होक्काइडोपासून सुमारे २५० किलोमीटर (१६० मैल) अंतरावर झाला आणि तो हलकासा जाणवला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की भूकंप १९.३ किलोमीटर (१२ मैल) खोलीवर झाला. कामचटकावर झालेल्या परिणामाबद्दल रशियाकडून तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही.
