साधारणपणे,थंडीमुळे शरीराची होणारी कुडकुड आणि ठरविक अंतरानंतर येणारा तीव्र ताप अशा लक्षणांमधून मलेरियाचं निदान होतं. ॲनोफिलीस नावाची मादी डास या आजाराला जबाबदार असते. जेव्हा ही मादी एखाद्याला चावते तेव्हा तिच्या लाळेतून प्लास्मोडियम पॅरासाईट व्यक्तीच्या शरीरात पसरतात. याच पॅरासाईटमुळे मलेरियाची लागण होते.
जागतिक महायुद्धांमध्ये मलेरियामुळे उडाला होता हाहाकार
28जुलै1914ते11नोव्हेंबर1918या काळात पहिलं जागतिक महायुद्ध लढलं गेलं होतं. या काळात मलेरियाने हाहाकार उडवला होता. या युद्धामुळे नऊ कोटी सैनिक आणि इतर कारणांमुळे1.3कोटी नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, 1918मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीने जगभरातील सुमारे100दशलक्ष लोकांचा जीव घेतला होता. त्याचवेळी मलेरियामुळेही मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला होता.
advertisement
1सप्टेंबर1939रोजी दुसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली होती. या युद्धात पाच कोटींहून अधिक लोक मारले गेले. या काळातसुद्धा मलेरियाने भीषण स्वरूप धारण केलं होतं. अमेरिकन सैन्यासाठी मलेरिया हा सर्वात मोठा धोका ठरला होता. दुसऱ्या महायुद्धात पाच लाखांहून अधिक लोक मलेरियामुळेबाधित झाले होते. आफ्रिका व दक्षिण पॅसिफिकमधील युद्धांच्या दरम्यान मलेरियामुळे60हजारांहून अधिक अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दक्षिण पॅसिफिक महासागर प्रदेशातील घनदाट जंगलात डासांची पैदास,कडक उष्णता,दलदल आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेला चिखल यामुळे सैनिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली होती. डासांमुळे सैनिक मलेरियाला बळी पडत होते. परिणामी युद्धभूमीवरील परिस्थिती बदलली होती.1942या एका वर्षामध्ये अमेरिका आणि फिलिपाईन्सच्या75हजार सैनिकांना मलेरियाची लागण झाली होती.
जपानविरुद्धच्या युद्धादरम्यान असंख्य सैनिक मलेरियाला बळी पडले होते. त्यापैकी57हजार सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. उपलब्ध आकडेवारीनुसार,त्या वेळी दक्षिण पॅसिफिकमध्ये तैनात असलेल्या 60 ते65 टक्के सैनिकांना मलेरियाची लागण झाली होती.
अजूनही जगभरात मलेरियाचं अस्तित्व
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, 2022मध्ये जगभरातील85देशांमध्ये मलेरियाची249दशलक्ष प्रकरणं नोंदवली गेली. यापैकी सहा लाख आठ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत आफ्रिकन प्रदेशात मलेरियाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.2022मध्ये,मलेरियाच्या एकूण प्रकरणांपैकी 94 टक्के म्हणजे 233 दशलक्ष प्रकरणं या प्रदेशात नोंदवली गेली होती. एकूण मृत्यूंपैकी 95 टक्के म्हणजे पाच लाख 80 हजार मृत्यू या प्रदेशात झाले. या भागात पाच वर्षांखालील80टक्के मुलांचा मलेरियामुळे मृत्यू झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि मलेरियाग्रस्त देशांतील आरोग्य यंत्रणा सर्वोत्तम प्रयत्न करत असूनही, 2021च्या तुलनेत 2022 मध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये आश्चर्यकारक वाढ नोंदवली गेली.2022मध्ये249दशलक्ष आणि2021मध्ये244दशलक्ष प्रकरणे जगभरात नोंदवली गेली.2021मध्ये मलेरियामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण किंचित जास्त होतं. या आजारामुळे सहा लाख10हजार लोकांनी आपला जीव गमावला.