काबूलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी दावा केला की काल रात्री अफगाण सुरक्षा दल आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चकमकीत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि 30 जण जखमी झाले. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण सुरक्षा दलातील 20 हून अधिक सदस्य जखमी किंवा शहीद झाले. या कारवाईत अफगाण सैन्याने असंख्य शस्त्रेही जप्त केली.
advertisement
तालिबान प्रवक्त्याने पाकिस्तानी सैन्य आणि सरकारवर त्यांच्या भूमीवर ISKP (इस्लामिक स्टेट - खोरासान प्रांत) दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि आश्रय दिल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांना कराची आणि इस्लामाबाद विमानतळांवर थेट प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर त्यांना अफगाणिस्तानात पाठवले जाते. मुजाहिद यांनी असाही दावा केला की तेहरान आणि मॉस्कोमधील हल्ले देखील पाकिस्तानमधील या केंद्रांमधूनच आखण्यात आले होते..
अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी खुलासा केला की आयएसआयएस-खोरासान (आयएसकेपी) चा प्रमुख आणि त्याचे प्रमुख सहकारी सध्या पाकिस्तानच्या भूमीवर लपून बसले आहेत. जबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहाब अल-मुहाजिर, अब्दुल हकीम तौहिदी, सुलतान अजीजाझम आणि सलाहुद्दीन रजब हे पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानी सरकारने त्यांना अफगाणिस्तानला सोपवावे किंवा त्यांना पाकिस्तानातून हाकलून लावावे अशी मागणी करतो.
तालिबान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की जर विरोधकांनी पुन्हा अफगाणिस्तानच्या सीमेचे उल्लंघन केले तर अफगाण सशस्त्र दल संपूर्ण तयारीने देशाच्या सीमांचे रक्षण करतील आणि जोरदार प्रत्युत्तर देतील.
अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंधांमध्ये दरी
२०२१ मध्ये तालिबान सत्तेत परतल्यापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की, दहशतवादी अफगाणिस्तानात आश्रय घेत आहेत, हा दावा अफगाण सरकारने नाकारला आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तणाव
पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाण तालिबानी सैन्याने काल रात्री (११ ऑक्टोबर) पाकिस्तानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी हल्ला केला. ज्यामध्ये पक्तिया, पक्तिका, कुनार, खोस्त, हेलमंड आणि नांगरहार यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानातील बाजारपेठेला लक्ष्य करून पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा तालिबानने केला.
ड्रोन आणि रडार सिस्टीमवरही परिणाम
पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर दिले आणि अनेक अफगाणिस्तानी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. मीडिया रिपोर्ट्स आणि व्हिडिओ फुटेजमध्ये पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले, काही तळ उद्ध्वस्त झाले आणि तालिबानने शस्त्रे हस्तगत केली. ड्रोन आणि रडार सिस्टीमवरही परिणाम झाला