TRENDING:

India USA Tarrif War : अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, इतर देशांपेक्षा कमी का जास्त?

Last Updated:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर सहमती न झाल्यामुळे हा टॅरिफ लावण्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून हे टॅरिफ लागू होणार आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊ शकते.
अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, इतर देशांपेक्षा कमी का जास्त?
अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, इतर देशांपेक्षा कमी का जास्त?
advertisement

अमेरिकेने टॅरिफ लावल्यामुळे भारतीय निर्यातदार खासकरून ऑटोमोबाईल, फार्मासिट्युकल आणि रत्न-आभूषण क्षेत्रांवर याचा विपरित परिणाम व्हायची शक्यता आहे. भारत सरकारने अमेरिकेच्या या निर्णयाचा आढावा घ्यायला सुरूवात केली असून व्यापार वार्ता जलद करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थतज्ज्ञांनुसार अमेरिकेचा हा टॅरिफ भारतीय अर्थव्यवस्था आणि रुपयांच्या किंमतीवर परिणाम करेल.

कोणत्या देशांवर किती टॅरिफ?

22 जुलै 2025 ला अमेरिका आणि फिलिपाईन्स यांच्यात द्विराष्ट्रीय व्यापार करार झाला, ज्यात फिलिपाईन्सच्या निर्यातीवर 19 टक्के टॅरिफ लावण्यात आला, जो आधी 20 टक्के होता. याबदल्यात फिलिपाईन्सने अमेरिकन ऑटोमोबाईल आणि औद्योगिक उत्पादनांवरचा टॅरिफ हटवला.

advertisement

अमेरिकेने इंडोनेशियावर 19 टक्के टॅरिफ लावला आहे, जो आधी 32 टक्के होता. तर अमेरिकेने जपानवर 15 टक्के टॅरिफ लावला आहे, जो आधी 25 टक्के होता. ऑटोमोबाईल टॅरिफ 15 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. युकेसोबत अमेरिकेचा 2024 साली ट्रेड सरप्लस होता, त्यामुळे युकेवर सगळ्यात कमी 10 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे, पण युकेमधील ऑटोमोबाईल आणि स्टील निर्यातीवर 25 टक्के टॅरिफ आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

मे 2025 साली अमेरिकेने चीनसोबत व्यापार करार केला, ज्यानंतर अमेरिकन टॅरिफ 145 टक्क्यांहून कमी करून 30 टक्के करण्यात आला आहे आणि चीनी टॅरिफ 125 टक्क्यांहून कमी करून 10 टक्के करण्यात आला. कॅनडा आणि मॅक्सिको या देशांवर सुरूवातीला 25 टक्के टॅरिफची घोषणा करण्यात आली होती, पण नंतर झालेल्या करारामुळे टॅरिफ एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. आता या देशांसोबत अमेरिकेची चर्चा सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
India USA Tarrif War : अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, इतर देशांपेक्षा कमी का जास्त?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल