TRENDING:

'दोस्त दोस्त ना रहा', मित्र का बनले कट्टर वैरी, ट्रम्प आणि मस्क यांच्यात का बिनसलं?

Last Updated:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात ट्विटरवर संघर्ष सुरू झाला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना धमकी दिली असून मस्क यांनी ट्रम्पवर गंभीर आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जगभरात आधीच टेरिफ वॉरचं सावट आणि भीती असताना आता अमेरिकेतच संघर्ष निर्माण होणार का अशी परिस्थिती झाली आहे. दोन चांगले मित्र एकमेकांचे कट्टर वैरी होतात की काय असं वाटायला लागलं आहे. सोशल मीडियावरुन यांच्यातील सुरू असलेला संघर्ष चव्हाट्यावर आली आणि संपूर्ण जगानं तो पाहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या नात्यात सगळं काही ठिक नाही याची कुणकुण लागली. त्यांनी एकमेकांवर आरोप करायला सुरुवात केली, इतकंच नाही तर ट्रम्प यांनी चक्क मस्क यांना धमकीही दिली आहे.
News18
News18
advertisement

जिगरी दोस्त म्हणून मस्क आणि ट्रम्प यांची जोडी जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आहे. दोघंही ट्विटरवर एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. ट्रम्प यांनी नुकतीच मस्क यांना एक थेट धमकी दिली आहे. ते म्हणाले की, मस्क यांच्या कंपन्यांचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील. दुसरीकडे, मस्क यांनीही ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

advertisement

एका बिलवरुन या दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. ट्रम्प यांच्या कर आणि खर्चाशी संबंधित एका बिलवर मस्क यांनी जोरदार टीका केली. त्यांनी या बिलला "जनतेच्या पैशांची उधळपट्टी" हे लाजिरवाणं असल्याचं म्हटलं होतं. मस्क यांनी 'एक्स'वर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, हे सर्व सहन करण्यापलीकडचे आहे. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, हे बिल रात्रीच्या वेळी घाईघाईने मंजूर करण्यात आले, जेणेकरून त्यावर जास्त चर्चा होऊ नये.

advertisement

एलन मस्क यांच्या टीकेनंतर ट्रम्प चांगलेच संतापले. त्यांनी मस्क यांच्या टिकेला उत्तर ट्विट करुन उत्तर दिलं. त्यावरुन या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि ट्विट वॉर रंगलं. एलन मस्क यांना या बिलबद्दल आधीच माहिती होतं, त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा त्यांना समजलं की इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी कमी केली जात आहे, तेव्हा त्यांच्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल. याच रागातून ट्रम्प यांनी मस्क यांना धमकी दिली की, ते सर्व सरकारी सबसिडी रद्द केल्या जातील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

ट्रम्प यांच्या आरोपांवर एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिलं. ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा आहे. हे बिल मला एकदाही दाखवण्यात आलं नाही आणि ते रात्रीच्या वेळी इतक्या वेगाने पास करण्यात आलं की काँग्रेसमधील जवळजवळ कोणालाही ते वाचायला मिळालं नाही!" मस्क यांनी पुढे असेही म्हटले की, जर त्यांनी ट्रम्प यांना साथ दिली नसती, तर ट्रम्प निवडणूक हरले असते. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील या संघर्षामुळे वॉशिंग्टन डीसीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन खासदारही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना नेमकी कोणाची साथ द्यावी असा प्रश्न पडला आहे. जनतेच्या मनातही याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ट्विटरवर सध्या त्यांच्या संघर्षाची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
'दोस्त दोस्त ना रहा', मित्र का बनले कट्टर वैरी, ट्रम्प आणि मस्क यांच्यात का बिनसलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल