व्लादिमीर पुतीन जेव्हा अलास्का इथे पोहोचले तेव्हा त्यांना घेण्यासाठी ट्रम्प आले. दोघेही रेड कारपेटवर चालत असताना अचानक मोठा आवाज झाला. पुतीन यांनी पटकन वर पाहिलं. हवेत बॉम्बिंग विमानं होती. ती काही क्षण हवेत तिथेच होती, त्यानंतर ती मागे फिरली, ट्रम्प यांनी दिलेली रिएक्शन खूप व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे हे नक्की काय होतं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
advertisement
पुतीन यांना सलामी होती की अमेरिकेचं शक्तीप्रदर्शन होतं अशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी अलास्कामध्ये ऐतिहासिक भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेली पहिली झलकच खास होती. रेड कार्पेटवर दोन्ही नेत्यांनी मोठ्या उत्साहात हस्तांदोलन केले. मात्र, या भेटीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, दोन्ही नेते रेड कार्पेटवर असताना त्यांच्या डोक्यावरून अमेरिकेचे शक्तिशाली B-2 बॉम्बर आणि F-22 रॅप्टर विमानांनी 'फ्लाईओवर' करत गर्जना केली.
हे दृश्य जगाला थेट संदेश देत होते की, 'शांततेची चर्चाही ताकदीच्या छत्रछायेखालीच होते'. पुतीन रशियाहून अमेरिकेच्या लष्करी तळावर उतरले तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या भव्य स्वागताची कल्पना नसावी. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी विशेष कारची सोय केलेली असताना ट्रम्प स्वत:च्या गाडीतून त्यांना बैठकीसाठी घेऊन गेले.
पुतीन यांच्या डोक्यावरुन गेलेलं बॉम्बिंग जेट हे शक्ती प्रदर्शन, इशारा वजा स्वागत असं असल्याची चर्चा सुरू झाली. एका बाजूला हे पुतीन यांचे स्वागत होते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेने आपली लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमधून दिसून आलं.
B-2 बॉम्बरची ताकद
या फायटरला आकाशातलं भूत म्हणून ओळखलं जातं. रडारची नजर चुकवून शत्रूंवर 35 हजार फुटांवरुन निशाणा करून उडवण्यात हे फायटर जे माहीर आहे. B-2 स्पिरिट, ज्याला सामान्यतः B-2 स्टेल्थ बॉम्बर म्हणून ओळखले जाते, ते अमेरिकेच्या हवाई दलातील सर्वात शक्तिशाली विमानांपैकी एक आहे.
१९८९ मध्ये पहिले उड्डाण घेतलेले हे विमान आजही जगातील सर्वात घातक आणि अभेद्य बॉम्बर मानले जाते. त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे, ते कोणत्याही सुरक्षित शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला भेदून आतमध्ये घुसून मोठा हल्ला करू शकते. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेने याच बॉम्बरचा वापर करून इराणच्या अणु ठिकाणांवर यशस्वी हल्ला केला होता.
