एएफपी या वृत्तसंस्थेने एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, न्याला विमानतळावर उतरताच झालेल्या बॉम्बस्फोटात यूएईचे हे विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या विमानाने आखाती देशातील एका विमानतळावरून उड्डाण केले होते आणि त्यात डझनभर परदेशी सैनिक आणि आरएसएफसाठी शस्त्रे आणि उपकरणे होती. आरएसएफने दारफूरचा बहुतेक भाग व्यापला आहे. जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांच्या नेतृत्वाखालील सुदानच्या सैन्याने युएईवर न्याला विमानतळाद्वारे आरएसएफला ड्रोनसारखी शस्त्रे पुरवल्याचा आरोप बराच काळ केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिकन अधिकारी आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अहवालात अन्यथा सूचित केले असले तरी, युएईने या आरोपांना नकार दिला आहे.
advertisement
कोलंबिया देखील लक्ष ठेवून आहे
कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर सांगितले की त्यांचे सरकार हल्ल्यात किती कोलंबियन लोक मारले गेले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी लिहिले की, 'त्यांचे मृतदेह परत आणता येतील का? ते आम्ही पाहू.' पेट्रो यांनी भाडोत्री लष्करी कारवायांवर बंदी घालण्याची मागणी केली. कोलंबियन भाडोत्री सैनिक, जे बहुतेक माजी सैनिक आहेत. ज्यांनी यापूर्वी येमेन आणि आखाती देशांमध्ये यूएईसाठी अनेकदा युद्ध केलं आहे. २०२४ च्या अखेरीपासून दारफुरमध्ये कोलंबियन सैनिकांच्या उपस्थितीची पुष्टी संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनी केली आहे.
दक्षिण दारफुरची राजधानी, न्याला विमानतळ गेल्या वर्षी आरएसएफच्या ताब्यात आलं. सुदानच्या लष्कराचा दावा आहे की, आरएसएफ परदेशी शस्त्रे आणि सोने तस्करी करण्यासाठी या विमानतळाचा वापर करते.
