TRENDING:

ती रात्र कदाचित उद्याचीच असेल! ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात घबराट; इराणमध्ये उद्या रात्री काय होणार?

Last Updated:

US-Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईरानविरोधात कठोर इशारा देत एका रात्रीत कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: इराणवर एका रात्रीत ताबा मिळवता येऊ शकतो आणि अशी कारवाई “कदाचित उद्याच रात्री” होऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, संपूर्ण देशावर एका रात्रीत नियंत्रण मिळवता येईल. आणि ती रात्र कदाचित उद्याचीच असू शकते.
News18
News18
advertisement

इराणने महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा उघडण्याच्या त्यांच्या दिलेल्या अंतिम मुदतीच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी हा इशारा दिला. त्यामुळे या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या वेळी ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही उपस्थित होते. यात संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचा समावेश होता. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एरिक ट्रम्प आणि टिफनी ट्रम्प व त्यांचे जोडीदारही उपस्थित होते.

advertisement

पत्रकार परिषदेला सुरुवात करताना ट्रम्प यांनी हा आमच्यासाठी सर्वोत्तम इस्टरपैकी एक होता असे सांगितले. यावेळी त्यांनी आठवड्याच्या शेवटी ईरानमध्ये अडकलेल्या दोन अमेरिकन वैमानिकांच्या नाट्यमय सुटकेचाही उल्लेख केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की शोध आणि बचाव मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 21 विमानांची मदत घेण्यात आली होती. ही विमाने तासन्तास अत्यंत तीव्र शत्रूच्या गोळीबारात उड्डाण करत होती. त्यांनी असेही नमूद केले की अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर गोळ्यांनी अक्षरशः छलनी झाले आहे.

advertisement

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या इस्टर एग रोल कार्यक्रमादरम्यान फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि इस्टर बनीच्या वेशातील शुभंकर यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ईरानविरोधातील आपले इशारे अधिक तीव्र केले. पत्रकारांशी बोलण्यापूर्वी त्यांनी दक्षिण लॉनवर उभे राहून म्हटले, "जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याकडे पूल, वीज प्रकल्प किंवा काहीच उरणार नाही. यापेक्षा वाईट गोष्टीही आहेत, पण त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही.”

advertisement

रविवारी पहाटे सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी शिवीगाळयुक्त भाषेत इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर मंगळवारपासून हल्ले करण्याची धमकी दिली होती. मात्र नंतर ही मुदत एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली. चर्चेत असलेला युद्धविराम प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. पण संघर्ष संपवण्यासाठी तो पुरेसा नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

व्हाईट हाऊसने 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची पुष्टी केल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली. इस्टर कार्यक्रमाच्या वेळी ते म्हणाले, हा एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे. एक मोठे पाऊल आहे. पण तो पुरेसा नाही. तरीही तो खूप महत्त्वाचा आहे. ते पुढे म्हणाले, सध्या चर्चा सुरू आहेत. पुढे काय होते ते पाहू.

advertisement

दरम्यान इराणच्या सरकारी माध्यमांनी हा युद्धविराम प्रस्ताव फेटाळून लावल्याचे सांगितले असून त्याला अमेरिकेचा प्रस्ताव असे संबोधले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सुरू झालेल्या आणि आता 38 दिवसांपासून चालू असलेल्या संघर्षाला तोडगा काढण्यासाठी अनेक देश राजनैतिक मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या संघर्षाला प्रत्युत्तर म्हणून तेहरानकडून संपूर्ण प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
ती रात्र कदाचित उद्याचीच असेल! ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात घबराट; इराणमध्ये उद्या रात्री काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल