TRENDING:

अमेरिकेचा जगाला हादरवणारा सर्वात मोठा निर्णय, 12 देशांना मोठा धक्का, भारतावर काय होणार परिणाम?

Last Updated:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव 12 देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी लावली आहे. 7 देशांवर अंशतः निर्बंध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: जगभारत सध्या इतक्या घडामोडी सुरू आहेत की त्याचा परिणाम दिसून येतच आहे. आधीच टॅरिफ वॉरचा झटका दिलेला असताना पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी मोठी घोषणा केली. याचा परिणाम जगभरातील देशांवर होणार आहे. एक दोन नव्हे तर चक्क 12 देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी लावण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव 12 देशांमधील नागरिकांना अमेरिकेत पूर्णपणे प्रवेश बंदी लावली आहे. याबाबतचा नवा आदेश जारी केला असून इतर 7 देशांमध्ये नागरिकांवर अंशत: निर्बंध लादण्यात आले आहेत. हा नवीन नियम 9 जून 2025 पासून लागू होईल. त्याचं पालन करणं बंधनकारक असेल असंही सांगितलं आहे. र्णतः बंदी घालण्यात आलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सूदान आणि येमेन यांचा समावेश आहे. या देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

advertisement

अंशतः निर्बंध लादण्यात आलेल्या देशांमध्ये बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. या देशांतील नागरिकांवर विशेष अटी लागू होतील. या देशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची अधिक कठोर चौकशी आणि तपासणी होईल अशा सूचना त्यांनी सुरक्षा यंत्रणांना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विमानतळ आणि इतर ठिकाणी देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

advertisement

अमेरिकेतील लोकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. कोलोराडोमधील नुकत्याच झालेल्या एका हल्ल्याचा संदर्भ देऊन आपण हा निर्णय का घेतला हे स्पष्ट केलं. नव्या आदेशामुळे अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणात मोठा बदल होणार असून, यामुळे प्रभावित देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अधिक कठोर अटींचा सामना करावा लागू शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

या यादीमध्ये तूर्तास तरी भारत, चीन या देशांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा थेट भारतावर परिणाम होणार नाही. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचे प्रवास बंदी धोरण परत आणले आहे. यावेळी हे निर्बंध केवळ स्थलांतरित व्हिसावरच लागू होणार नाहीत तर बी-1 (व्यवसाय), बी-2 (पर्यटन), एफ (विद्यार्थी), एम (व्यावसायिक) आणि जे (एक्सचेंज प्रोग्राम) सारख्या गैर-स्थलांतरित व्हिसावर देखील लागू होतील. हे पाऊल अशा देशांवर केंद्रित आहे ज्यांच्याकडून व्हिसा ओव्हरस्टे दर खूप जास्त आहे किंवा जे अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्थांना योग्यरित्या सहकार्य करत नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेचा जगाला हादरवणारा सर्वात मोठा निर्णय, 12 देशांना मोठा धक्का, भारतावर काय होणार परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल