अटलांटिक महासागरात निर्माण झालेल्या एरिन वादळाने वेग घेतला आहे. पुढील काही दिवसांत ते एका मोठ्या वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने (एनएचसी) शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आपल्या सल्लागारात म्हटले आहे की, हे वादळ रविवारपर्यंत अति तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर हाय अलर्ट दिला आहे.
एनएचसीच्या मते, एरिन वादळ लीवर्ड बेटांच्या उत्तरेकडे सरकत आहे आणि त्यामुळे पुढील २४ तासांत अँगुइला, सेंट मार्टिन, सेंट बार्थेलेमी, साबा, सेंट युस्टाटियस आणि सिंट मार्टिन सारख्या भागात उष्णकटिबंधीय वादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत वादळाचा वेग ताशी 85 किमी वेगाने वारे वाहता होते. रात्री 11 वाजेपर्यंत 100 किमी प्रति किमी होता. तोच 160 किमीपर्यंत वाढण्याचा धोका आहे. हे वादळ दिसेल त्याला घेऊन जाईल त्यामुळे सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की हे वादळ उत्तर लीवर्ड बेटे, व्हर्जिन बेटे आणि प्यूर्टो रिकोच्या अगदी जवळून जाईल. या क्षेत्रांसह, टर्क्स आणि कैकोस आणि आग्नेय बहामासला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी हे वादळ अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडा पासून खूप दूर राहील आणि तेथे धडकण्याची शक्यता फारच कमी आहे. फ्लोरिडा ते न्यू इंग्लंड आणि अटलांटिक कॅनडा पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांवर उंच लाटा आणि धोकादायक रिप करंट दिसण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचा अंदाज आहे की एरिन प्यूर्टो रिकोच्या उत्तरेकडून जाताना जास्त धोकादायक होऊ शकतं. रविवारपर्यंत प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन आयलंडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडू शकतो. यासोबतच, ताशी 50 किमीहून अधिक वेगाने जोरदार वारे वाहतील आणि भूस्खलनाचा धोका आहे. या हंगामात 18 वादळं येऊ शकतात त्या पैकी 5 ते 9 चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
