TRENDING:

लग्नाची पहिली रात्र, मध्यरात्रीच नवरी अचानक गायब; सत्य समजताच हादरला नवरदेव

Last Updated:

नवरदेव झोपला होता, त्याला जाग आली तेव्हा वधू बेडवरून गायब असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर असं सत्य त्याच्यासमोर आलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : लग्नानंतर वर-वधूसाठी खास असते ती लग्नाची पहिली रात्र. नुकतंच लग्न झालेल एक कपल, ज्यांनी लग्नाची पहिली रात्र घालवली. पण सुहागरतनंतर नवरी अचानक गायब झाली. वर झोपला होता, त्याला जाग आली तेव्हा वधू बेडवरून गायब असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर असं सत्य त्याच्यासमोर आलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतील ही घटना आहे. जैस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हे प्रकरण. 2 नोव्हेंबर रोजी हे लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर वधू गायब झाली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरदेवाने तिला फोन केला, तिचा शोध घेतला पण वधू काही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी वधूच्या माहेरच्यांना सांगण्यात आलं. तेव्हा असं सत्य समोर आलं की सगळ्यांना धक्का बसला.

advertisement

हनीमूनची पहिली रात्र! कपलने शेअर केला आपला प्रायव्हेट Video; रिल्समध्ये सगळं दाखवलं

सुहागरातनंतर नववधू शेजाऱ्यासोबत पळून गेल्याचं उघडल झालं. यात त्यांना दोन तरुणांनी मदत केली. ती आपल्यासोबत रोख रक्कम आणि दागिनेही घेऊन गेली. वधूच्या या कृत्यानं वधू आणि वर दोन्ही कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वधूचे वडील म्हणाले, आमच्या मुलीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण हे नातं आम्हाला मान्य नव्हतं. त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी आम्ही आमच्या मुलीचं लग्न जैस येथील तरुणाशी लावून दिलं. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबरला जावयाने आमच्या मुलीच्या कृत्याबद्दल सांगितलं. मुलीचा प्रियकरही बेपत्ता असल्याचं समजलं. तेव्हा आमची शंका विश्वासात बदलली.

advertisement

लग्नाची पहिली रात्र! नवरा-नवरीने उत्साहात नको तेच केलं; बेडरूममधील VIDEO VIRAL

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी नवविवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून वधूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी म्हणाले, वधूच्या शोधासाठी आम्ही अनेक पोलीस पथकं तयार केली आहेत. लवकरच या सर्वांना अटक करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
लग्नाची पहिली रात्र, मध्यरात्रीच नवरी अचानक गायब; सत्य समजताच हादरला नवरदेव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल