जैसलमेरच्या पश्चिमेला सुमारे 17 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. येथे तुटलेली घरं आणि भिंती दिसतात पण माणसं दिसत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी हे ठिकाण एक समृद्ध गाव होतं, ज्याचं नाव कुलधरा होतं. मात्र आता ते मोडकळीस आलं आहे. असं मानलं जातं, की इथले लोक हे गाव रातोरात सोडून गेले, जणू ते गायबच झाले. असं त्यांच्यासोबत नेमकं काय झालं? ही कथा 300 वर्षांहून अधिक जुनी आहे. त्या काळात या गावात पालीवाल ब्राह्मण राहत होते.
advertisement
Viral News: लग्नानंतर हनिमूनला गेले; हॉटेलमध्ये जाताच नवरीचं भलतंच कांड, CCTV फुटेज पाहून हादरला पती
असं मानलं जातं की त्या काळात या ठिकाणचे प्रधान सलीम सिंह होते, ज्यांची वाईट नजर या गावातील प्रमुखाच्या मुलीवर पडली जी अतिशय सुंदर होती. त्यांना त्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करायचं होतं. त्यांनी गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की, त्या मुलीला वाचवण्यासाठी कोणी मधे आलं किंवा तिला लपवण्याचा प्रयत्न केला तर त्या सर्वांना ठार मारलं जाईल. या भीतीपोटी ते गाव आणि आजूबाजूच्या 85 गावांनी बैठक बोलावली आणि एका रात्रीतून अचानक ते निघून गेले.
आता गाव रिकामं करताना साहजिकच सगळेजण आपापल्या अंथरूण आणि सामान घेऊन इथून निघून गेले असावेत, असं तुम्हाला वाटेल! पण असं झालं नाही. ते सगळे आपापलं सामान, रोजच्या वस्तू, अगदी खाण्यापिण्याचं सगळंच तिथेच टाकून घाईघाईने गावातून निघून गेले. न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, गाव सोडताना त्यांनी या ठिकाणाला शाप दिला की या गावात पुन्हा कधीच वस्ती होणार नाही आणि इतर कोणीही तिथे राहू शकणार नाही.
आजपर्यंत या गावात कोणीही राहू शकलेलं नाही. अनेक दशकांपासून ते त्याच अवस्थेत आहे. दिवसा किंवा रात्री इथे जाताना भीती वाटत असल्याचा दावा लोकांनी केला आहे. काही लोकांचं असंही म्हणणं आहे, की सलीम सिंहने गावावर इतका कर लादला होता की लोक तो भरू शकले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी गेले. आता या गावाची देखभाल पुरातत्व सर्वेक्षण आणि भारताकडून केली जाते.
