गुजरातच्या अहमदाबादमधील रेल्वे स्टेशनवरील ही घटना. प्लॅटफॉर्मवरील डस्टबिनमधून अचानक आवाज येऊ लागला आणि लोकांची गर्दी जमू लागली. त्यानं रेल्वे स्टेशन पोलीस म्हणजे आरपीएफही तिथं लगेच पोहोचलं. डस्टबिनच्या आत पाहिलं तर त्यात एक बाळ होतं. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे मूल रेल्वे स्टेशनवरील कचऱ्याच्या डब्यात कुठून आलं, याचा शोध आरपीएफने सुरू केला. पथकाने रेल्वे स्टेशनचे सर्व सीसीटीव्ही तपासले. आणि जे सत्य समोर आले ते धक्कादायक होतं.
advertisement
चॉकलेटच्या बहाण्याने घेतले पैसे, पण विकत आणल्या त्या दोन गोष्टी, 13 वर्षांच्या मुलानं गमावला जीव
आरपीएफने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिला फाटक्या दुपट्ट्यात गुंडाळलेल्या बाळाला स्टेशनवर सोडताना दिसली. 28 ऑक्टोबर रोजी एका महिलेने बाळाला इथं धंधुका रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं. रेल्वे पोलिसांनी महिलेची ओळख पटवून तिची माहिती मिळवली आणि तिला शोधून काढलं.
तिची चौकशी केली असता तिनं सांगितलं की, ती आणि तिचा पती, जो रोजंदारीवर काम करतो. दोन महिन्यांपूर्वीच ते धंधुका इथं आले आणि रेल्वे स्टेशनजवळ राहत होते. 27 ऑक्टोबरच्या रात्री महिलेला प्रसूती वेदना झाल्या. त्यांना आधीच तीन मुली आहेत आणि त्यांना मुलगा हवा होता. पण मुलगीच जन्माला आली त्यामुळे आईने बाळाला स्टेशनवर सोडण्याचा कठीण निर्णय घेतला.
धंधुका पोलीस निरीक्षक रमेश गोजिया यांनी सांगितलं की, हे जोडपं मूळचं मध्य प्रदेशचे असून ते गुजरातच्या विविध भागात परप्रांतीय मजूर म्हणून काम करत होतं. रेल्वे पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पती अनेकदा आपल्या पत्नीला शिवीगाळ करत असे आणि टोमणे मारत असे, यामुळे ती तिच्या इतर तीन लहान मुलींना घेऊन रेल्वे स्टेशनवर गेली आणि नवजात बाळाला डस्टबिनमध्ये टाकलं. कोणीतरी मुलाला शोधून त्याची काळजी घेईल असा विश्वास तिला होता.
धंधुका येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुलीची तपासणी केली असता ती निरोगी असल्याचे आढळून आलं. या बाळाला त्याचा आईकडेच सोपवण्यात आलं आहे, त्याआधी तिचं समुपदेशन केलं गेलं.