TRENDING:

भारताच्या Solar Mission आधी आकाशात दिसलं असं अद्भुत दृश्य, सूर्याशीच संबंध; VIDEO VIRAL

Last Updated:

भारताचं सूर्ययान सूर्याच्या दिशेने झेपावण्याआधी आकाशातील या अद्भुत दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर साऱ्या जगाचं लक्ष इस्रोच्या सौर मोहिमेकडे लागलं आहे. भारताची पहिली सौरमोहिम. आदित्य एल-1 हे सूर्ययान श्रीहरिकोटा येथून 2 सप्टेंबर रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. पण त्याआधीच आकाशात अद्भुत असं दृश्य दिसलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
आकाशातील अद्भुत दृश्य
आकाशातील अद्भुत दृश्य
advertisement

एका व्यक्तीला विमानातून प्रवास करताना आकाशात असं काहीतरी विचित्र दिसलं की ते त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.  ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरही पोस्ट केला. जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आकाशात ग्रीन लाइट पेटताना दिसला. हिरव्या रंगाचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. सामान्यपणे तुम्ही निळ्या, पांढऱ्या, काळ्या, लाल, नारिंगी अशा रंगांचं आकाश पाहिलं असेल पण हिरव्या रंगाचं आकाश कसं काय?

advertisement

Viral news : आपण चंद्राकडे पाहत होतो आणि एक मोठं संकट पृथ्वीच्या अगदी जवळ आलं आणि...

@vincentledvina इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. ज्यात हिरवं आकाश झगमगताना दिसेल.  ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार तो रात्री विमानातून युरोपला जात होता. रात्रभर तो झोपला नाही. प्लेन कॅनडाहून जात होतं तेव्हा हे जादुई दृश्य दिसलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

हे दृश्य म्हणजे नॉर्दन लाइट्स आहेत. डायचे वॅलेच्या वृत्तानुसार सूर्यातून आगीच्या ज्वाळा निघत असतात, ज्या सौरवादळासारख्या असतात. खरंतर हे चार्ज्ड पार्टिकल्स असतात जे पृथ्वीपर्यंत पोहोचण्यात दोन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. जेव्हा ही गरम हवा पृथ्वीच्या वातावरणात येते तेव्हा तीव्र प्रकाशाची निर्मिती होते. जो आपल्याला हिरव्या रंगाचा दिसतो. यालाच नॉर्दर्न लाइट्स किंवा ऑरोरा बोरियालिस म्हणतात. नार्वेमध्ये हे दृश्य दिसतं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
भारताच्या Solar Mission आधी आकाशात दिसलं असं अद्भुत दृश्य, सूर्याशीच संबंध; VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल