फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुझइयां गावात हळदी समारंभानंतर तयार होऊन लग्नाच्या वरातीची वाट पाहत बसलेल्या नववधूच्या आनंदाचं निराशेमध्ये रूपांतर झालं. कारण नवरदेवाने ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याने लग्नाची वरात रस्त्यातूनच परतली. गावात वधू पक्षाचे लोक नाच-गाणी करत आनंद साजरा करत होते. लोक लग्नाची वरात येण्याची वाट पाहत होते. लग्नाची वरात न आल्याने वराच्या घरच्यांशी संपर्क साधण्यात आला तेव्हा समजलं की, लग्नाची वरात रस्त्यातूनच परतली होती आणि आता नवरदेव मंडपात येणार नव्हता.
advertisement
'तुला पहिल्यांदा पाहिलं अन्..'; तरुणाने अख्ख्या शहरात लावले अजब होर्डिंग; आता पोलीस घेतायेत शोध
वरात परत जाण्यामागे दोन्ही पक्षांचे प्रमुख आणि मध्यस्थांमध्ये झालेली बाचाबाची असल्याचे सांगितले जात आहे. एका व्यवहारावरून वाद झाला आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. वाद आणि बाचाबाची झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दारूच्या नशेत असलेले वरातीतील लोक पोलिसांचा एक शब्दही ऐकायला तयार नव्हते. अखेर हे लग्न झालंच नाही. लग्नाची वरात परत गेल्यानंतर वधूकडील लोक लग्नात झालेला खर्च परत मागताना दिसले.
एवढंच नाही तर वधूने पोलीस ठाण्यात जाऊन वर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. लग्नाची वरात हुंड्यासाठी परत नेल्याचा आरोप वधूने केला आहे. फतेहपूर चौरासी पोलीस स्टेशन हद्दीतील मुझइयां खुर्द गावात राहणाऱ्या प्रियांकाचा विवाह फतेहपूर चौरासी पोलीस स्टेशन हद्दीतील चागखेडा येथील रहिवासी प्रिन्स उर्फ जयबाबू याच्यासोबत निश्चित झाला होता. मुलीच्या बाजूच्या लोकांनी सकाळपासूनच लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या होत्या. आता मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार असल्याची चर्चा आहे.
