विद्यार्थी म्हणाला, “सर, तुम्ही इतके हुशार आहात, तर तुम्ही तुमचा मेंदू दान कराल का?” या अनपेक्षित प्रश्नावर खान सरांनी क्षणाचाही विलंब न लावता, 'ब्रेन डोनेशन' म्हणजेच 'मेंदू दान' करण्याची संकल्पना इतक्या सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितली की सगळेच अवाक् झाले.
"माझा मेंदू दुसऱ्याच्या शरीरात टाकला तर..."
खान सर हसून म्हणाले, “अरे, किडनी किंवा लिव्हरप्रमाणे मेंदूचं प्रत्यारोपण (Transplant) शक्य नसतं. पण समजा, जर माझा मेंदू काढून तुझ्या शरीरात बसवला, तर काय होईल माहितीये? शरीर तुझं राहील, पण आतून तू पूर्णपणे 'खान सर' होशील!” ते पुढे म्हणाले, “तू माझ्यासारखाच विचार करायला लागशील. माझ्यासारखंच पहाटे लवकर उठून क्लास आणि मीटिंगला जायला लागशील. गंमत म्हणजे, तू तुझ्या घरच्यांना ओळखणार नाहीस आणि माझ्या आई-वडिलांना पाहिल्यावर त्यांची आपुलकीने चौकशी करशील. लोक तर म्हणायला लागतील की तुझ्या अंगात 'खान सरांचा भूत' शिरला आहे!”
advertisement
मेंदू दान का शक्य नाही?
या विनोदी उदाहरणातून खान सरांनी एक गंभीर वैज्ञानिक सत्य समजावून सांगितले. ते म्हणाले की, ज्याला आपण 'मन' म्हणतो, तो प्रत्यक्षात आपला मेंदूच असतो. आपले विचार, बोलणे आणि प्रत्येक हालचाल हाच अवयव नियंत्रित करतो. त्यामुळे मेंदू बदलणे म्हणजे व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच बदलण्यासारखे आहे. मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचा मेंदू केवळ संशोधनासाठी दान केला जाऊ शकतो, तो दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येत नाही. मेंदू प्रत्यारोपण हे केवळ विज्ञान कथा किंवा चित्रपटांपुरतेच मर्यादित आहे, वास्तवात ते शक्य नाही.
हे ही वाचा : एकाच जागी फिरतात गोल-गोल; कुत्र्यांना होतो 'हा' खतरनाक आजार, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक!
हे ही वाचा : 'बहिणीशी' लग्न! मुस्लिमांच्या या प्रथेमागे दडलेलं मोठं सत्य; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! पाहा VIDEO