TRENDING:

डोंगरात अडकली कार, लोकांनी लावला जुगाड; पुढे काय घडलं? पाहा Viral Video

Last Updated:

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 03 सप्टेंबर : भारतीयांचं नाव जगभरात जुगाडासाठी ओळखलं जातं. दररोजच्या वापरातील वस्तूंसाठी अनेक भारतीय जोरदार जुगाड करतात. काही जुगाड तर फेल जातात. परंतु असे अनेक जुगाड आहेत ज्यांनी लोकांचं आयुष्य बदललं आहे. जुगाडाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच समोर येत असतात. हे व्हिडीओ लोकांना हसवतात.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल.

तसे पाहाता डोंगरावर कार चालवणे सोपे काम नाही. चांगल्या चांगल्या ड्रायव्हर्सलाही इथे गाडी चालवण्याची भीती वाटते. कारण येथील रस्ते आणि क्लायमेट दोन्हीही चॅलेंजिंग आहे. डोंगराळ भागातील रस्ते इतके बारीक आणि अरुंद असतात की अनेक ठिकाणी गाड्या अडकतात.

advertisement

पण डोंगराळ भागात रहाणाऱ्या लोकांना तर या सगळ्या गोष्टींची इतकी सवय झालेली असते की त्यांना या सगळ्याचं काहीच वाटत नाही आणि ते या अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे जुगाड करत असतात. अशाच एका जुगाडबाज लोकांचे व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एका अरुंद रस्त्यावर एक कार अडकली आहे. त्या कारला तिथून जाण्यासाठी रस्ता अपूरा पडत आहे. ज्यामुळे कारचा तोल जाऊन ती खाली देखील पडू शकते. लवास्तविक कार एका दगडात अडकली आहे त्यामुळे प्रत्येक वेळी तो गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो परंतू गाडी गाडी मागेच जाते.

advertisement

तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर ते तात्काळ चालकाच्या मदतीसाठी पुढे आले. ते एक लांब लाकडी फळी आणतात. जी त्याने अरुंद रस्त्याच्या कडेला उभी केली आणि नंतर ड्रायव्हरने हळूच गाडी बाहेर काढली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

या व्हिडीओला सोशल मीडियावर अपलोड करताच जोरदार कमेंट्स आणि लाईक्स आले आहेत. तसेच लोक या व्हिडीओला पसंत करत आहेत आणि आपल्या मित्रांना शेअर करत आहेत.

मराठी बातम्या/Viral/
डोंगरात अडकली कार, लोकांनी लावला जुगाड; पुढे काय घडलं? पाहा Viral Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल