मसाला डोसा एक साऊथ इंडियन डिश. देशभरातील अनेक लोक हा पदार्थ आवडीने खातात आणि याच पदार्थामुळे चांद्रयान 3 च्या मोहिमेलाही बळ मिळालं. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशात मसाला डोसाचाही मोलाचा वाटा असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. आता चांद्रयानशी मसाला डोसाचं काय आणि कसं कनेक्शन, असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चांद्रयान आणि मसाला डोसाचा हा संबंध काय आणि कसा ते आता सविस्तर पाहुयात.
advertisement
भारताच्या Solar Mission आधी आकाशात दिसलं असं अद्भुत दृश्य, सूर्याशीच संबंध; VIDEO VIRAL
पत्रकार बरखा दत्त यांनी द वॉशिंग्टन पोस्टच्या एका अभिप्रायात इस्रोच्या टीमने काय काय केलं ते सांगितलं. "आम्ही दररोज संध्याकाळी 5 वाजता मोफत मसाला डोसा आणि फिल्टर कॉफी देऊन ही मोहीम क्रॅक केली, असं मिशन शास्त्रज्ञ व्यंकटेश्वर शर्मा यांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या.
याचा परिणाम म्हणजे सर्वांना प्रोत्साहन मिळालं. प्रत्येक जण स्वतःचे जास्त तास देऊ लागले. अधिक तास काम करण्यास सर्वजण प्रवृत्त झाले. अचानक प्रत्येक जण अधिक कालावधी काम करण्यात आनंद मानू लागला, असं ते म्हणाले. जेव्हा काळ कठीण होता आणि चांद्रयान-3 ला अशक्यही साध्य करण्याच्या सामना करावा लागत होता, तेव्हा कोणतंही आर्थिक प्रोत्साहन नव्हते. त्यावेळी मसाला डोसा बचावासाठी आल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं.
लुना-25 क्रॅश लँडिंग, NASA ने शोधून काढली ती जागा, समोर आले Photo
चांद्रयान-3 ही इस्रोची तिसरी चंद्र शोध मोहीम ठरली. 2019 मधील चांद्रयान-2 मोहिमेचे सातत्य म्हणून हे मिशन काम करतं. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची संपूर्ण क्षमता प्रदर्शित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 चं बजेट 615 कोटी रुपये होतं. त्या तुलनेत चांद्रयान-2 मोहिमेचा एकूण खर्च 978 कोटी रुपये होता.
