TRENDING:

Video : 13 व्या मजल्यावरून लटकतायत दोन मुलं, धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा

Last Updated:

उंच इमारतीत राहणं हा अनेकांसाठी स्वप्नवत अनुभव असतो. मात्र अशा ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांनी मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियाची दुनिया ही व्हिडीओशी संबंधीत आहे. लोक इथे दररोज आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय इथे काही मजेदार, धक्कादायक, तर कधी विचार करायला लावणारे व्हिडीओ ही समोर येतात. पण या सगळ्या असा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

उंच इमारतीत राहणं हा अनेकांसाठी स्वप्नवत अनुभव असतो. मात्र अशा ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांनी मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. कारण थोडीशीही दुर्लक्ष झाली, तर ती मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळालं.

चीनमधील एका मल्टिस्टोरी अपार्टमेंटच्या 13 व्या मजल्यावरून दोन लहान मुलं धोकादायक पद्धतीने लटकताना दिसली. हा प्रसंग इतका थरारक होता की ते पाहाणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. व्हिडिओमध्ये दिसतं की ही दोन्ही मुलं बाल्कनीच्या रेलिंगला पकडून खाली लटकली आहेत. त्यातल्या एका मुलाने तर लटकलेल्या अवस्थेत पुल-अप्स करायला सुरुवात केली, जणू हा सगळा प्रकार एखादं खेळणं असल्यासारखा तो हे करत होता.

advertisement

पण 13 व्या मजल्यावरून पडणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळे हा नजारा पाहणारे लोक हादरले. व्हिडिओच्या शेवटी मुलांना सुरक्षित वाचवलं गेलं की नाही, याची माहिती मिळत नाही. मात्र लोक सतत त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करताना दिसले.

शेजाऱ्याने टिपला थरारक क्षण

ही घटना जवळ राहणाऱ्या एका शेजाऱ्याने कॅमेऱ्यात कैद केली आणि ती सोशल मीडियावर शेअर होताच तुफान व्हायरल झाली. काही लोकांनी याला पालकांची बेजबाबदार वागणूक ठरवलं. मुलांना अशा उंचीवर, तेही रेलिंगला लटकू देणं यात पालकांची चुकी असल्याचं लोकांनी म्हटलं आहे.

advertisement

इंस्टाग्रामवर @nihaochongqing या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. एका यूजरने लिहिलं, "इतके बेफिकीर पालकांना तर थेट तुरुंगात पाठवायला हवं." दुसऱ्याने म्हटलं, "देवा, हे पाहून अंगावर काटा उभा राहिला शहारलं." तर काहींनी चिंता व्यक्त करत विचारलं, "मुलं ठीक असतील ना?"

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

या घटनेनंतर इंटरनेटवर पालकांच्या जबाबदारीवर मोठी चर्चा रंगली आहे. मुलं कितीही समजदार असली, तरी अशा उंचीवर त्यांना एकटं सोडणं किंवा धोकादायक खेळ खेळू देणं हे खूपच गंभीर असल्याचं लोकांनी म्हटलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Video : 13 व्या मजल्यावरून लटकतायत दोन मुलं, धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल