TRENDING:

Dream 11 वर 3 कोटी जिंकले, तर बँकेत किती येईल पैसा? रक्कम इतकी आकडा ऐकून बसेल धक्का

Last Updated:

आता लोक फक्त सामने पाहात नाही, तर लोक आता Dream 11 सारख्या fantasy apps वर टीम बनवून पैसेही जिंकू लागलेत. लोक आपल्याकडे असलेल्या क्रिकेट नॉलेजचा वापर करुन पैसे जिंकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : क्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त नसून ती एक भावना आहे. त्यामुळे क्रिकेट म्हटलं की भारतीय नेहमीच उत्साही असतात. आता तर IPL सुरू झाला आहे. लोक आपआपल्या राज्याला किंवा आवडत्या टीमला सपोर्ट करत आहेत आणि ती टीम जिंकावी अशी इच्छा व्यक्त कर आहेत.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

पण आता लोक फक्त सामने पाहात नाही, तर लोक आता Dream 11 सारख्या fantasy apps वर टीम बनवून पैसेही जिंकू लागलेत. लोक आपल्याकडे असलेल्या क्रिकेट नॉलेजचा वापर करुन पैसे जिंकतात. यामध्ये त्यांना फक्त सध्या सुरु असलेल्या मॅचमधील प्लेइंग इलेव्हन्स पैकी लोक घेऊन आपली टीम बनवायची असते आणि आपल्या आवडीचा कॅप्टन आणि वाइस कॅप्टन ठेवायचा असतो.

advertisement

तसे पाहाता या ऍपवर सगळ्यांनाच पैसे जिंकणं शक्य नाही, पण असे काही लोक आहेत, ज्यांनी यावर पैसे जिंकले आहेत. पण गंमत ही आहे की, जरी तुम्ही 1 कोटी जिंकलात, तरी तुमच्या हातात पूर्ण पैसे येत नाहीत. त्यावर भारी भरकम TDS आणि Tax लागतो.

चला आपण याचं गणित समजून घेऊ

रवी कुमार नावाच्या युवकाने नुकतेच Dream11 वरून 3 कोटी रुपये जिंकले. पण त्याच्या खात्यात प्रत्यक्षात किती आलेत, हे ऐकून तुम्हीही चकित व्हाल! कारण त्यावर आधी ३०% TDS म्हणजेच ९० लाख रुपये थेट कापले जातात. उरलेले २ कोटी १० लाखच त्याच्या अकाउंटमध्ये जमा होतात.

advertisement

पण एवढ्यावरच गोष्ट संपत नाही...

जुलै महिन्यात जेव्हा Income Tax Return फाईल करावं लागतं, तेव्हा उरलेले २७ लाख रुपये अजून भरावे लागतात. म्हणजे सगळं मिळून रवीच्या हातात 1 कोटी 83 लाख रुपयेच राहतात.

Investment Guru काय सांगतात?

सरस जैन नावाचे इन्व्हेस्टमेंट एक्स्पर्ट सांगतात की, ड्रीम 11 सारख्या प्लॅटफॉर्मवर पैसे जिंकले की लगेच खर्च न करता, पैशांचं योग्य नियोजन करावं. कारण ही रेग्युलर इनकम नसते. आणि जर चुकीचं इन्व्हेस्ट केलं, तर सगळं भराभर उडूनही जाऊ शकतं.

advertisement

पैसे इन्व्हेस्ट करताना हे '5 स्टेप प्लॅन' फॉलो करा:

20% पैसे किसान विकास पत्र मध्ये लावा – जिथे 9.6 वर्षांत पैसे दुप्पट होतात.

पुढचे 20% पैसे नेशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये – 5 वर्षात 1.5 पट रिटर्न.

आणखी 20% रक्कम मार्केट लिंक प्लॅन मध्ये – थोडा रिस्क पण जास्त फायदा.

20% भागातून जमीन घ्या – गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय.

advertisement

उरलेले 20% तुम्ही बिझनेस किंवा घरासाठी वापरू शकता. पण सुरुवातीला कमी पैसे गुंतवा, नंतर हळूहळू वाढवा.

मराठी बातम्या/Viral/
Dream 11 वर 3 कोटी जिंकले, तर बँकेत किती येईल पैसा? रक्कम इतकी आकडा ऐकून बसेल धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल