पती-पत्नीचं पटत असेल तर यांचे 36 गुण जुळतात असं म्हणतात. ज्यांचे 36 गुण जुळतात त्या जोडप्यांचा संसार चांगला होतो, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण प्रत्यक्षात तसं नाही. याबाबत सविस्तर जाणून घेण्याआधी ते 36 गुण कोणते ते पाहुयात.
36 गुण कोणते?
पत्रिकेतील 36 गुण जुळायला हवेत, असे तुम्ही ऐकले असेल. मात्र ते 36 गुण कोणते आहेत, ते जाणून घ्या.
advertisement
नाडी - आठ गुण
भकुटाचे गुण- सात
गण मैत्री - सहा गुण
ग्रह मैत्री - पाच गुण
Numerology: पटणार की भांडत बसणार? दोघांच्या जन्मतारखांवरून आधीच ओळखून घेऊ शकता
योनी मैत्री - चार गुण
ग्रहबळ - तीन गुण
वश्य - दोन गुण
वर्ण - एक गुण
किमान किती गुण जुळायला हवेत?
पत्रिकेत एकूण 36 गुण असतात. त्यापैकी मुलगा आणि मुलीचे निम्मे म्हणजेच किमान 18 गुण जुळणं आवश्यक असतं. यापेक्षा कमी गुण जुळत असतील तर ते लग्न यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. लग्न मोडण्याची भीती कायम असते. त्यामुळे जर एखाद्या मुलाचे-मुलीशी 18 पेक्षा कमी गुण जुळत असतील तर लग्न करणं टाळतात.
Tulsi Vivah 2024: तुळशी विवाह कधी आहे? 2 शुभ योग, पहा पूजेचा शुभ मुहूर्त, लग्नसराईला तेथून सुरुवात
ज्या मुला-मुलीचे 18 ते 25 गुण जुळतात, त्यांचे वैवाहिक जीवन चांगले राहील, असे मानले जाते.
ज्या मुला-मुलीचे 25 ते 32 गुण एकमेकांशी जुळतात, त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदी राहील, असे मानले जाते.
एखाद्या जोडप्याचे जर 32 ते 36 गुण जुळत असतील तर ते खूप शुभ आणि उत्तम मानले जाते. एवढे गुण जुळणं खूप दुर्मिळ असते. फार कमी लोकांचे एवढे गुण जुळतात.
कोणाचे जुळले होते 36 गुण
भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे 36 गुणे जुळले होते, असे मानले जाते. मात्र ज्यांचे एकमेकांशी 36 पैकी 36 गुण जुळतात, त्यांनी एकमेकांशी लग्न करणं शुभ नसतं. 36 गुण जुळत असल्यामुळे भगवान राम आणि सीता माता यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे 36 गुण जुळणं अशुभ मानतात. तसेच प्रभू श्रीराम यांच्या कुंडलीत काही असे योग होते, ज्यामुळे त्यांना वैवाहिक आयुष्यात खूप संकटं आली.
