देवेंद्र दत्त असं या जवानाचं नाव आहे. ते आसामच्या दिमापूरमध्ये आसाम रायफल्समध्ये कार्यरत आहेत. हा जवान राजधानी एक्स्प्रेसच्या बी-9 एसी कोचमधून प्रवास करत होता. कटिहारमध्ये दारूच्या नशेत त्याने मोठा गोंधळ घातला. ट्रेनमध्येच दारू पीत होता, प्रवाशांशी गैरवर्तन करत होता. प्रवाशांनी याची माहिती ट्रेनमध्ये आरपीएफ आणि टीटीला दिली. टीटीने जवानाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकला नाही.
advertisement
टीटीने समस्तीपूर येथील कंट्रोलला घटनेची माहिती दिली आणि मदत मागितली.
लग्नाचं वऱ्हाड नेण्यासाठी रेल्वेचा संपूर्ण कोच बुक करायचा की सीट? काय स्वस्त पडतं?
माहिती मिळताच समस्तीपूर स्थानकावर आरपीएफ-जीआरपी पथक तैनात करण्यात आलं. राजधानी एक्स्प्रेस स्टेशनवर येताच जीआरपीने ट्रेनमध्ये गोंधळ घालणाऱ्या जवानाला ताब्यात घेतलं. त्याच्या बॅगेची झडती घेतली. तर त्यात दारूच्या चार बाटल्या आढळून आल्या. या जवानाने आरपीएफ-जीआरपीच्या पथकालाही हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रमुख व्हीपी आलोक यांनी सांगितलं की, जवानाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.