TRENDING:

Kitchen Jugaad Video : कपडे धुण्याशिवाय वॉशिंग मशीनचा असाही वापर; एकदा पाहाल तर नेहमी कराल

Last Updated:

वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलण्याची सोपी पद्धत एका गृहिणीने दाखवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : वॉशिंग मशीनमध्ये आपण सामान्यपणे कपडे धुतो. पण कपडे धुण्याशिवाय वॉशिंग मशीनचा आणखी एक असा अनोखा वापर. जो तुम्ही पाहाल तर थक्क व्हाल. वॉशिंग मशीनमुळे कपड्यांशिवाय तुमचं आणखी एक मोठं काम हलकं होईल. तुम्हाला विश्वास बसणार नाही की वॉशिंग मशीनमध्ये असं काही करता येऊ शकतं. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दिला आहे.
News18
News18
advertisement

तुम्हाला काय वाटतं, वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही आणखी काय करू शकता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही यात चक्क लसूण सोलू शकता.  स्वयंपाक करताना सर्वात कंटाळवाणं आणि वेळ लागणारं काम कोणतं विचारलं तर कुणीही सांगेल ते म्हणजे लसूण सोलण्याचं. लसणीच्या कांद्यापासून एकएक पाकळी वेगळी करून त्याची साल काढणं म्हणजे खूपच त्रासदायक. लसूण सोलण्यात वेळही जातो आणि कंटाळाही येतो. पण वॉशिंग मशीनमुळे तुमचं हे मिनिटांचं काम अवघ्या काही तासात होईल.

advertisement

Kitchen Jugaad Video - दागिने लॉकर नाही टॉयलेटमध्ये ठेवा; काय आहे फायदा VIDEO एकदा पाहाच

आता वॉशिंग मशीनमध्ये लसूण कशी सोलायची तो पाहुयात. तुम्हाला जितकी लसूण लागणार आहे तितकी लसूण घ्या. लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करा आणि ही लसूण 15-20 मिनिटं थंड पाण्यात टाकून ठेवा. आता कॉटन बॅग किंवा सुती कापड घ्या. त्यात भिजवलेला लसूण ठेवून त्यात गुंडाळून घ्या. आता लसूण गुंडाळलेलं हे कापड वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये टाका. झाकण लावून 2 ते 5 सेकंद फिरवून घ्या.

advertisement

आता वॉशिंग मशीनमधील लसूण ठेवलेलं कापड बाहेर काढा आणि उघडून पाहा. लसणीच्या साली निघालेल्या दिसतील. पण तरी त्यातील एक एक लसूण निवडून काढणंही शक्य नाही. त्यामुळे पुन्हा ही लसूण सालीसह पाण्यात टाका. साली हलक्या असल्याने त्या पाण्याच्या वर तरंगतील तर लसूण पाण्याच्या तळाशी राहिल.

Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावा; विचित्र आहे पण फायदाही मोठा

advertisement

वर्दान पक्वान युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अगदी कमीत कमी वेळेत लसूण सोलण्याची ही सोपी पद्धत आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : कपडे धुण्याशिवाय वॉशिंग मशीनचा असाही वापर; एकदा पाहाल तर नेहमी कराल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल