TRENDING:

VIDEO : समोरून मेट्रो आली, तरीही तरुणीचं नव्हतं लक्ष; ट्रॅकवर गेली आणि घडलं धक्कादायक

Last Updated:

प्रवास करताना काळजी घ्यावी, असं वारंवार सांगितलं जातं. नजर हटी दुर्घटना घटी असे बोर्डही सतर्क करण्यासाठी जागोजागी लावले जातात. मात्र तरीही काहींसोबत अपघात घडतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : प्रवास करताना काळजी घ्यावी, असं वारंवार सांगितलं जातं. नजर हटी दुर्घटना घटी असे बोर्डही सतर्क करण्यासाठी जागोजागी लावले जातात. मात्र तरीही काहींसोबत अपघात घडतात. निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. समोरुन येणारी वाहनं, ट्रेनही काहींना समजत नाहीत. आपल्याच धुंदीत असलेल्यांसोबत असे अपघात सर्रास घडतात. असाच काहीसा प्रकार समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. एक तरुणी आपल्या धुंतीत ट्रॅकवर चालत होती. तिला समोरून आलेल्या मेट्रोचंही समजलं नाही.
मेट्रोची तरुणीला धडक
मेट्रोची तरुणीला धडक
advertisement

अनेकदा लोक आपल्या स्वतःच्या चुकीमुळे अपघाताचे बळी ठरतात. सध्याच्या व्हिडीओमध्ये तरुणीचा घाई आणि निष्काळजीपणा तिला भोवला आहे. समोरुन येणाऱ्या मेट्रोने तरुणीला जोरदार धडक दिली.

10 वर्षाच्या मुलीचं लावलं लग्न! काही दिवसांतच झाला मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी रेल्वे ट्रॅकवर आहे. ती ट्रॅक ओलांडत आहे. मात्र समोरुम मेट्रो येत आहे याचं भानही मुलीला नव्हतं. तेवढ्यात मेट्रो येते आणि तरुणीला जबर धडक बसते. मुलीलं कानात हेडफोन घातल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिला आसपासचा आणि मेट्रोचाही आवाज आला नाही. मेट्रो चालकानं हॉर्नही दिला मात्र तोपर्यंत मुलगी ट्रॅक ओलांडून पुढे आली होती. मग काय मेट्रोची तरुणीला धडक बसली आणि तरुणी दूर पडली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

मेट्रो अधिक वेगात असते तर तरुणीचा जीवही जाऊ शकला असता. सुदैवानं मेट्रो कमी वेगात होती आणि तरुणीला जास्त इजा झाली नाही. @watchpplsurvive नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. अनेकांनी निष्काळजी आणि मोबाईल गाणी ऐकण्याच्या नादात अपघात झाल्याचं म्हटलं. मुलीची चुक असल्याचं नेटकरी कमेंट करत बोलत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
VIDEO : समोरून मेट्रो आली, तरीही तरुणीचं नव्हतं लक्ष; ट्रॅकवर गेली आणि घडलं धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल