TRENDING:

Mumbai Guide : कुठून सुरु होते आणि कुठे संपते मुंबई? काय आहेत तिच्या भौगोलिक सीमा? मुंबकरांनाही माहित नसतील 'या' गोष्टी

Last Updated:

या मुंबई संबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहित नाही. जे लोक मुंबईत अनेक वर्षांपासून रहातात, त्यांना देखील या फॅक्टबद्दल माहित नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले भारताचे आर्थिक राजधानी असलेले शहर म्हटलं की आपोआपाच तुमच्या तोंडावर पहिलं नाव असेल मुंबई! इथली गजबजलेली लोकसंख्या, गगनचुंबी इमारती आणि सतत धावणाऱ्या लोकल ट्रेन पाहून असं वाटतं की हे शहर कधीच थांबत नाही. त्यामुळेच तर याला स्वप्नांचं शहर म्हणतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

इथे लोक आपल्या स्वप्नांच्या आणि नोकरीच्या शोधात येतात. अनेकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई मदत करते. अगदी रिकाम्या हाती लोक मुंबईत आले तरी लोक बरंच काही इथून घेऊन किंवा कमावून जातात.

पण या मुंबई संबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहित नाही. जे लोक मुंबईत अनेक वर्षांपासून रहातात, त्यांना देखील या फॅक्टबद्दल माहित नाही.

advertisement

अनेक लोकांना हे माहितच नाही की, मुंबई कुठे सुरू होते आणि कुठे संपते! तुम्हाला ही माहित नसेल, तर चला जाणून घेऊ त्याच्या भौगोलिक सीमा.

मुंबईची सुरुवात: ‘भायंदर खाडीपासून’

जर तुम्ही उत्तरेकडून मुंबईत प्रवेश करत असाल, तर भायंदर खाडी म्हणजेच दहिसर टोल नाका हे मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते. दहिसर चेकनाका ओलांडल्यावर तुम्ही ठाणे जिल्ह्यातून अधिकृतपणे मुंबई महानगरात प्रवेश करता. इथेच मुंबई महापालिकेच्या हद्दीची सुरुवात होते.

advertisement

दक्षिणेकडील शेवट: ‘कोलाबा ते नारिमन पॉईंट’

मुंबईची हद्द दक्षिणेला कोलाबा आणि नारिमन पॉइंटपर्यंत जाते. याच्या पुढे अरबी समुद्र आहे. गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि मरीन ड्राईव्ह हे भाग म्हणजे मुंबईच्या शेवटच्या टोकावर असलेली काही महत्त्वाची ठिकाणं आहेत.

पूर्व मुंबई: ‘मुलुंडचा पूर्वेकडील प्रवेशद्वार’

पूर्व मुंबईचा शेवट ठाणे जिल्ह्याच्या सीमेजवळ मुलुंड टोल नाक्याजवळ होतो. इथून पुढे ठाणे शहर सुरू होते. मुलुंड आणि भांडूप हे भाग मुंबईत असले तरी यांच्या पुढे कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेची हद्द सुरू होते.

advertisement

पश्चिम मुंबई: ‘अरबी समुद्र आणि पश्चिम किनारपट्टी’

मुंबईच्या पश्चिम भागात गोराई, मढ आयलंड, मनोरी, अक्सा बीच आणि वरसोवा हे भाग येतात. या भागांचा शेवट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. त्यामुळे पश्चिमेकडून मुंबईची सीमा ही समुद्रानेच ठरवली आहे.

मुंबईच्या हद्दीबाहेर काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या (BMC) बाहेर मीरा-भायंदर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि वसई-विरार हे शहरे येतात. अनेक लोक याच शहरी राहून रोज मुंबईत कामासाठी ये-जा करतात. त्यामुळे मुंबईचं प्रत्यक्ष क्षेत्रफळ 603.4 चौरस किलोमीटर असलं तरी, संपूर्ण महानगरीय परिसर 4,355 चौरस किलोमीटरचा आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Mumbai Guide : कुठून सुरु होते आणि कुठे संपते मुंबई? काय आहेत तिच्या भौगोलिक सीमा? मुंबकरांनाही माहित नसतील 'या' गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल