सोशल मीडियावर पापा की परी संबंधीत देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना तुम्ही पाहिलं असणार. अशा मुली जे कळत-नकळत काहीतरी चुका करतात अशा मुलींना सोशल मीडियावर पापा की परी म्हटलं जातं.
अशाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. या व्हिडीओत एक तरुणी पाण्यात कायाकिंग करताना असा काही प्रकार करते की पाहून नेटीझन्सना हसू आवरत नाही.
advertisement
आतापर्यंत स्कूटी चालवताना मुलींकडून अनेकदा चुका घडल्या असल्याचं तुम्ही पाहिलं असेल, पण या वेळी या तरूणीकडून पाण्यात कायाकिंग चालवताना एक चुक झाली. कायाकिंगच्या बोटीत दोन तरुणी बसल्या होत्या. तुम्हाला आजूबाजूला अनेक लोक कायाकिंग करताना दिसतील. तेव्हा दोन तरुणी पाण्यात पुढे जात असताना त्याच्या रस्त्यात एक मुलगा कायाकिंगमध्ये होता. या तरुणाला पाहून या मुलिंनी रस्ता बदलणं अपेक्षित होतं किंवा थांबणं अपेक्षित होतं. पण तरी देखील ही तरुणी कायाकिंग चालवत राहिली, ज्यामुळे ती समोरील मुलाला जाऊन धडकली.
या धडकेमुळे या मुलाची कायाकिंग पलटली आणि तो उलटा पाण्यात पडला. नशिबाने थोड्यावेळाने कायाकिंग सरळ झाली. ज्यामुळे हा तरुण बाहेर आला. पण तो पाण्यामुळे पूर्ण ओला झाला होता.
हा व्हिडीओ इथेच संपतो. पण व्हिडीओत पुढे मात्र मीम्स सुरु असतात. ज्यामध्ये एक व्यक्ती म्हणे भाई अभी करे तो क्या करे?
हा मजेशीर व्हिडिओ X वरील @VishalMalvi_ या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – "स्कूटीपर्यंत ठीक होतं दीदी, पण आता बोटिंगमध्येही?"
व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तरुणीच्या अशा वागण्यामुळे नेटकरी मजेनं आता मुलींवर विश्वासच ठेऊ नये असं म्हणू लागले आहेत.
