कन्नौज शहरात आज पहाटे एकच खळबळ उडाली जेव्हा एका अज्ञात प्रियकराने शहरातील अनेक भागात मोठमोठे होर्डिंग लावून आपलं प्रेम व्यक्त केलं. त्यानंतर संपूर्ण शहरात या प्रेमाची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही हे होर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, पोलिसांनी होर्डिंग उतरवून ते लावणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शहराच्या मध्यभागी हे मोठमोठे होर्डिंग लावणाऱ्या निनावी प्रियकराचीही ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
advertisement
शेतातून रात्रंदिवस यायचे आवाज; एकसोबत अख्खं गावच पाहण्यासाठी गेलं, कारण समजताच भीतीने उडाला थरकाप
त्या व्यक्तीने होर्डिंगवर इंग्रजीत लिहिलं आहे की "I am all yours since i met at first sight with you i promise to be beside you till my last breath no matter”. याचा अर्थ असा की जेव्हापासून 'मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून मी तुझाच आहे. मी वचन देतो की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत असेन, काहीही झालं तरी'. याखाली Marry Me असंही लिहिलं आहे.
एकतर्फी प्रेमात असलेल्या एका तरुणाने यातूनच आपल्या प्रेयसीला लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याचा होर्डिंग पाहून अंदाज बांधता येतो. या आगळ्यावेगळ्या होर्डिंगचा व्हायरल फोटो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित निरीक्षकांना घटनास्थळी पाठवून होर्डिंग उतरवून घेतले आणि तपास सुरू केला.
