याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाच चर्चीत व्हिडीओ आहे. खरंतर वरातीच्यावेळी दोन पक्षांमध्ये छोट्याश्या मुद्द्यावरून बाचाबाची होते आणि नंतर याचं रुपांतर मारामारीत होतं. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे.
व्हिडीओ फक्त लग्नाशी संबंधित आहे. यामध्ये वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की किती लोक लग्नाला आले होते. सर्वजण जेवण करताना दिसतात. अचानक क्षुल्लक गोष्टीवरून सभागृहात वाद वाढतो. त्यानंतर लोकांचा संयम सुटतो आणि त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
लग्नात जेवण उरकल्यावर हा वाद सुरू झाला आणि तो वाढला असे सांगितले जात आहे. काही लोक दोन्ही बाजूंमधील भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण गोंधळ घालणाऱ्यांना काही फरक पडत नाही. लोक एकमेकांना लाथा-बुक्के मारत आहेत तसेच खुर्च्यांवरून भांडत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ लखनऊच्या अमिनाबाद भागात असलेल्या धर्मशाळेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नात या व्हिडीओमध्ये जसा सीन दिसतो तसा प्रकार इतरत्र सहसा दिसत नाही. @SabirSh48723440 नावाच्या X हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
