या कारणास्तव, आज आम्ही तुम्हाला टकीला संबंधित काही माहिती देणार आहोत, जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यापैकी एक म्हणजे टकीला बनवण्याची पद्धत.
तो कसा बनवला जातो आणि त्यासोबत फक्त लिंबू आणि मीठ का खाल्लं जातं? असा प्रश्न उपस्थीत होतो.
@foodnetwork या Instagram खात्यावर खाण्यापिण्याशी संबंधित मनोरंजक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये टकीला बनवण्याची पद्धत सांगितली आहे. टकीला फळापासून बनवले जाते.
advertisement
टकीला हे अॅव्हेव्ह वनस्पतींपासून बनवले जाते.
कारागीर प्रथम या झाडाचे रोपे गोळा करतात. त्यानंतर त्याच्या प्रक्रियेचे काम सुरू होते. ते मशीनद्वारे चिरले जाते, नंतर ते द्रव स्वरूपात बनवले जाते. अनेक मशीन्समधून गेल्यानंतर ते डिस्टिल्ड केले जाते. जेव्हा ते पूर्णपणे टकीला बनते, तेव्हा ते बाटल्यांमध्ये भरले जाते. झाकण आणि लेबल लावल्यानंतर ते पॅक केलं जातं.
पण आता प्रश्न असा की टकीला मीठ आणि लिंबूसोबत का प्यायलं जातं?
स्टॅनफोर्ड प्रेस वेबसाइटनुसार, असे मानले जाते की 19 व्या शतकात टकीला पिण्याची स्पर्धा होती. लोक हे पेय मोठ्या प्रमाणात पिऊ लागले. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे टकीला तयार होऊ लागले. त्याची खराब चव दूर करण्यासाठी त्यासोबत मीठ आणि लिंबू दिले. हा मेक्सिकन संस्कृतीचा एक प्रकार होता जो आजपर्यंत प्रचलित आहे.
