लॉरा ओटिंग असं या महिलेचं नाव आहे. तिनं आपल्या या विचित्र आजाराबाबत सांगितलं आहे. लॉराने सांगितल्यानुसार नोव्हेंबर 2020 च्या अखेरीस तिला कोरडा खोकला होऊ लागला. तिला वाटलं की ती कोविडची शिकार झाली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात तिच्या डझनभर कोविड-19 चाचण्या झाल्या. मात्र त्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. तिचा खोकला सुरू होता.
advertisement
अंगणवाडीतून घरी परतली मुलं, वागू लागली विचित्र; समोर आलं असं कारण की उडाली खळबळ
2021 च्या सुरुवातीला अचानक तिच्या बोटांवरची त्वचा सरडा किंवा सापासारखी निघू लागली. याशिवाय तिच्या खांद्यावर आणि हातावर विचित्र खुणा दिसू लागल्या. तिनं अनेक डॉक्टर बदलले, औषधं बदलली, क्रीम बदलले, लोशन बदलले पण काहीच उपयोग झाला नाही. कालांतराने तिच्या वेदना, पुरळ आणि त्याचं प्रमाणही वाढलं. तिला कपडे घालता येत नव्हते, झोप येत नव्हती, बूटही घालता येत नव्हते. लॉरानं सांगितलं की ही लक्षं काही दिवसांपासून होती. पण एक दिवस सकाळी उठल्यानंतर या लक्षणांनी गंभीर रूप धारण केलं.
दातदुखीमुळे वैतागला व्यक्ती; शेवटी घरीच स्वतःच्या हाताने ओढून काढला दात, अन् मग...
तिच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या. पण तिच्या आजाराचं नेमकं निदान होईना. अखेर तिला काय झालं आहे हे समजलं आणि तिला धक्काच बसला. तिला एक दुर्मिळ ऑटो इम्युन डिसीज झाला होता. पिटिरियासिस रुब्रा पिलारिस (पीआरपी) असं या आजाराचं नाव.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. अमेरिकेत फक्त 800 लोकांना हा दुर्मिळ आजार आहे. केमोथेरपीच्या अनेक सेशननंतर लॉराची प्रकृती आता ठिक आहे आणि ती बरी होत आहे. आता ती मॅरेथॉनमध्ये धावते. अशा रोगांपासून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, एकतर भीतीने जगणं किंवा धैर्यानं जगणं, असं ती म्हणाली.
