'दुबई ड्रेस' नावाने ओळखला जाणारा हा ड्रेस म्हणजे केवळ एक वस्त्र नाही, तर सोनारकामाच्या कलेचा एक अद्भुत नमुना आहे. तब्बल 10 किलोपेक्षा जास्त वजनाचा हा ड्रेस पाहताक्षणीच डोळे दिपवून टाकतो. अल रोमैझन गोल्ड अँड ज्वेलरी कंपनीच्या कलाकारांनी याला घडवले आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न... या सोन्याच्या महावस्त्राची किंमत किती?
advertisement
या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. याची किंमत आहे तब्बल 11 कोटी रुपये (4.6 दशलक्ष दिरहाम)! फॅशन आणि दागिन्यांच्या दुनियेतील या अनोख्या मिलाफाने लक्झरीची एक नवीन व्याख्याच जगासमोर ठेवली आहे.
कसा घडला हा चमत्कारी ड्रेस?
हा ड्रेस म्हणजे केवळ सोन्याचा एकसंध तुकडा नाही, तर चार वेगवेगळ्या भागांना एकत्र जोडून तयार केलेली एक कलाकृती आहे. यात समाविष्ट आहे...
- सोन्याचा मुकुट (Crown) : 398 ग्रॅम वजनाचा एक राजेशाही मुकुट.
- स्टेटमेंट नेकलेस : तब्बल 8 किलो 810 ग्रॅम वजनाचा एक भव्य हार, जो ड्रेसचा मुख्य भाग आहे.
- सोन्याची कर्णभूषणे (Earrings) : 134 ग्रॅम वजनाची सुंदर कानातली.
- 'हेयार' (Heyar) : 738 ग्रॅम सोन्याचा एक खास तुकडा, ज्यावर मौल्यवान रत्ने वापरून फुलांची नाजूक नक्षी कोरण्यात आली आहे.
या ड्रेसवरील आकर्षक कोरीवकाम आणि रंगीबेरंगी रत्नांची सजावट संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते.
980 तासांची मेहनत आणि एक मोठी कल्पना
हा ड्रेस बनवण्यासाठी कलाकारांना तब्बल 980 तास, म्हणजेच 40 दिवसांपेक्षा जास्त काळ लागला. यामागे केवळ एक ड्रेस बनवण्याचा हेतू नव्हता, तर एक मोठी कल्पना होती. ज्वेलरी ब्रँडचे उपव्यवस्थापक मोहसिन अल धैबानी सांगतात की, "दुबईला दागिन्यांचे आणि सोन्याचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा ड्रेस केवळ सोनं नाही, तर तो UAE च्या लोकांची कथा सांगतो." थोडक्यात, हा ड्रेस म्हणजे केवळ एक महागडी वस्तू नाही, तर दुबईची महत्त्वाकांक्षा, कलाकारांचे कौशल्य आणि एका देशाच्या समृद्ध वारशाचे चालते-बोलते प्रतीक आहे.
हे ही वाचा : Chanakya Niti : तुमच्या या सवयीच तुम्हाला करतील कंगाल, चाणक्यनीतीत सांगितल्यात त्या कोणत्या
हे ही वाचा : Indian Railway : तिकिटीसाठी दिले 500 रुपये, महिला क्लर्कनं केलं असं काही की प्रवाशाची उडाली झोप
