थर्टी फर्स्टला जंगी पार्टी करायचा करताय प्लॅन? 'या' राशींच्या लोकांना आज दारू पिणं पडू शकत महागात!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज 31 डिसेंबर, 2025. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यंदाचा थर्टी फर्स्ट आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.
New Year Celebration : आज 31 डिसेंबर, 2025. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यंदाचा थर्टी फर्स्ट आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. आज 'भागवत एकादशी' असून सोबतीला 'सर्वार्थ सिद्धी योग' आहे. शास्त्रांनुसार एकादशीच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. विशेषतः 4 राशींच्या लोकांसाठी आजची 'मद्यधुंद' पार्टी भविष्यात मोठे संकट ओढवून आणू शकते.
मीन
साडेसातीचा प्रभाव: मीन राशीच्या लोकांवर सध्या शनीच्या साडेसातीचा दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरू आहे. शनी हा शिस्तीचा आणि न्यायाचा देवता आहे. एकादशीच्या पवित्र दिवशी मद्यपान केल्याने शनीचा प्रकोप वाढू शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या किंवा मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सात्विक राहणे तुमच्यासाठी हितकारक ठरेल.
मेष
रागावर नियंत्रण सुटेल: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. आज मेष राशीत चंद्राचे भ्रमण असल्याने भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. अशात दारूचे सेवन केल्यास तुमचा राग अनावर होऊन वादविवाद किंवा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. थर्टी फर्स्टची मजा एका क्षणात सजा ठरू शकते.
advertisement
मिथुन
आरोग्याचे नुकसान: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने नाजूक आहे. एकादशीच्या दिवशी शरीरातील ऊर्जा बदललेली असते. आज मद्यपान केल्याने पोटाचे विकार किंवा लिव्हरशी संबंधित अचानक समस्या उद्भवू शकतात. नवीन वर्षाची सुरुवात आजारपणाने होऊ नये असे वाटत असेल, तर आज दारूपासून लांब राहा.
तूळ
आर्थिक हानीचे योग: तूळ राशीच्या व्यक्तींना आज ग्रहांच्या स्थितीमुळे भ्रमाचा सामना करावा लागू शकतो. नशेत असताना तुम्ही चुकीचे आर्थिक निर्णय घेऊ शकता किंवा मौल्यवान वस्तू हरवू शकता. आज 'नशा' तुमच्या प्रगतीत मोठा अडथळा ठरू शकते.
advertisement
आज रात्री उशिरापर्यंत एकादशीची तिथी आहे. विष्णू पुराणात नमूद केल्याप्रमाणे, जे लोक एकादशीला मादक पदार्थांचे सेवन करतात, त्यांच्या पुण्याचा नाश होतो आणि पुढील वर्षभर त्यांना दुर्दैवाचा सामना करावा लागतो. तुमची एक दिवसाची मजा 364 दिवसांचे गणित बिघडवू शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
थर्टी फर्स्टला जंगी पार्टी करायचा करताय प्लॅन? 'या' राशींच्या लोकांना आज दारू पिणं पडू शकत महागात!










