advertisement

600 किमी रेंज, शानदार लूक, मार्केटमध्ये येतेय लवकरच 7 सीटर SUV, पहिली झलक समोर

Last Updated:

Skoda लवकरच भारतात आपली एक दमदार अशी SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एससूव्ही Vision 7S या कॉन्सेप्ट कारवर तयार झाली आहे

News18
News18
भारतात वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणाच्या समस्येवर ईलेक्ट्रिक वाहनं हा बेस्ट पर्याय ठरत आहे. ईलेक्ट्रिक कार, बाईकने मार्केट आता व्यापून टाकलं आहे. ईलेक्ट्रिक वाहनांमध्ये रेंजसाठी पर्याय मिळत असल्यामुळे EV वाहनांच्या खरेदीकडे कल वाढला आहे. भारतीय कंपन्या टाटा मोटर्स आणि महिंद्र मोटर्सने ईलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये एकहाती सत्ता गाजवत आहे. पण, आता परदेशी कंपनी skoda आता भारतात आपली पहिली दमदार अशी EV 7 सीटर SUV घेऊन येत आहे. Vision 7S या कॉन्सेप्टच्या प्रोडक्शन-रेडी व्हर्जनचं नाव Peaq असणार आहे.
advertisement
Skoda लवकरच भारतात आपली एक दमदार अशी SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एससूव्ही Vision 7S या कॉन्सेप्ट कारवर तयार झाली आहे. Peaq असं नाव स्कोडाने या एसयूव्हीला दिलं आहे.  Peaq  एसयू्ही ही मर्सिडीज-बेंझ GLB आणि Peugeot e-5008 ला टक्कर देईल.  नवीन स्कोडा Peaq ही चेक ऑटोमेकरची सर्वात महागडी कार असणार आहे. ही  SUV 2026 च्या उन्हाळ्यात जगभरात एकाच दिवशी लाँच केली जाईल.
advertisement
स्कोडा Peaq EV मध्ये वेगळं काय? 
स्कोडाने मागील वर्षी भारतात झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये Vision 7S कॉन्सेप्ट एसयूव्हीची झलक दाखवली होती. आता 2027 मध्ये ही एसयूव्ही लाँच होणार आहे. Peaq  ची लांबी  4.9 मीटर इतकी आहे. रेडी स्कोडा Peaq च्या केबिनमध्ये लेदर-फ्री अपहोल्स्ट्रीसारख्या सस्टेनेबल मटेरियल्सचा वापर केला जाऊ शकतो.
बॅटरी आणि रेंज किती? 
स्कोडाने दाखवलेल्या कॉन्सेप्टमध्ये 89kWh बॅटरी पॅक होता, जो WLTP नुसार एकदा चार्ज केल्यावर 600 किमी पेक्षा जास्त रेंज देतो, असा दावा कंपनीने केला होता.  Peaq मध्ये 200kW पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. हे RWD (रियर-व्हील ड्राइव्ह) आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) हे दोन्ही प्रकार असणार आहे.
advertisement
“Vision 7S सोबत आम्ही स्कोडासाठी नवीन मार्ग खुला केला आहेत, ज्यात ब्रँडला उंचावण्याचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. त्यानंतर आम्ही नवीन डिझाईन लँग्वेज आणले आणि आमच्या प्रोडक्ट आयडेंटिटीला आणखी चांगली केली आहे. आता आम्ही या इनोव्हेटिव्ह व्हेईकल कॉन्सेप्टला प्रत्यक्षात आणत आहोत. आमचा नवीन फ्लॅगशिप मॉडेल आमच्या ब्रँडच्या स्पेशियसनेस आणि प्रॅक्टिकलिटीला एका नवीन पातळीवर घेऊन जाईल. आजपासून, स्कोडाच्या इलेक्ट्रिक फ्युचरसाठी आमचा बोल्ड व्हिजन एका नावासोबत आहे Peaq, जे आमचा हा मॉडेल आमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठे आहे' असा विश्वास  स्कोडा ऑटोचे सेल्स आणि मार्केटिंग बोर्ड सदस्य मार्टिन जान यांनी सांगितलं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
600 किमी रेंज, शानदार लूक, मार्केटमध्ये येतेय लवकरच 7 सीटर SUV, पहिली झलक समोर
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement