रत्नागिरीत महेश काळेचा Live Show, बघायला गेले प्रेक्षक पण तिथे काहीच नव्हतं, नेमकं काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
रत्नागिरीत महेश काळेचा लाइव्ह शो आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षक शो पाहण्यासाठी गेले पण तिथे काहीच नव्हतं. रत्नागिरीत नेमकं झालं काय?
लोकप्रिय शास्त्रीय गायक महेश काळे नुकताच झी मराठीच्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत दिसला होता. तर दुसरीकडे महेश काळेचे अनेक शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू आहेत. महेश काळेच्या शोसाठी प्रचंड गर्दी असते. थिएटर हाऊसफुल असतात. पण नुकताच महेश काळेचा एक शो आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षक शो पाहण्यासाठी गेले पण तिथे काहीच नव्हतं. नेमकं घडलं काय?
रविवारी संध्याकाळी गायक महेश काळेच्या मैफिलीचा कार्यक्रम रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावरती सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र तो अचानक रद्द करण्यात आला. ज्यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय झाली. प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली. प्रेक्षकांनी व्यक्त केलेली नाराजी पाहून महेश काळेनं स्वत: पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली.
काही अपरिहार्य कारणांमुळे आणि पावसाचे सावट असल्याने रत्नागिरी येथे श्री. महेश काळे स्वरसंध्या कार्यक्रम रद्द करीत आहोत. ऑनलाईन बुकिंग केलेल्या रसिकांना 4/5 दिवसात refund मिळेल. काउंटर बुकिंग केलेल्या लोकांना 4 एप्रिल पासून सकाळी 10 ते 7 या वेळेत काउंटर वर पैसे परत केले जातील, येताना तिकीट आणणे आवश्यक आहे. रसिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ! अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली होती. मात्र ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. कार्यक्रमाच्या दिवशी प्रेक्षकांना हे कळलं आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
advertisement
दरम्यान महेश काळेनं स्वत: पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली. महेशनं पोस्टमध्ये लिहिलं, "आत्ताच समजलं रत्नागिरीतील कार्यक्रम रद्द झाल्याचा संदेश काही लोकांपर्यंत पोचला नाही आणि त्यांची गैरसोय झाली."

"माझ्या कार्यक्रमाच्या निम्मिताने अशी लोकांची गैरसोय झाली याचं फार वाईट वाटलं. मी तर खरं वाट पाहतो आहे केव्हा रत्नागिरीला येऊन तुमच्या फर्माईशी पूर्ण करेन. आशा करतो लवकरच भेट होईल."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 1:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
रत्नागिरीत महेश काळेचा Live Show, बघायला गेले प्रेक्षक पण तिथे काहीच नव्हतं, नेमकं काय घडलं?








