advertisement

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! पत्नीने साथ सोडली, लेकीचं तोंड पाहायलाही आसुसलेल्या बापाने जगाचा घेतला निरोप

Last Updated:

आयुष्यात आलेल्या दुःखाच्या काळोख्या त्याने जग सोडले. पत्नी न आल्याने त्रस्त झालेल्या प्रेमने रविवारी मध्यरात्री घराच्या वासर्‍यात साडीने गळफास घेतला.

लेकराची काळजी घे,माझ्या मातीला येऊ नको' म्हणत प्रेमने जग सोडले!"
लेकराची काळजी घे,माझ्या मातीला येऊ नको' म्हणत प्रेमने जग सोडले!"
सोलापूर : वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या प्रेम अंकुश जाधव वय 28 यांच्या आयुष्यात आलेल्या दुःखाच्या काळोख्या त्याने जग सोडले. पत्नी न आल्याने त्रस्त झालेल्या प्रेमने रविवारी मध्यरात्री घराच्या वासर्‍यात साडीने गळफास घेतला. पण भाऊ ऐनवेळी धावून आल्याने आणि शेजार्‍यांच्या मदतीने तो शासकीय रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी मात्र मृत घोषित केले. या घटनेने कुटुंब आणि गाव हादरले.
दोन महिन्यांपूर्वीच प्रेमला मुलगी झाली. याचा आनंद साजरा करण्याऐवजी पत्नी माहेरी गेली आणि परतलीच नाही. शिमगा सणासाठी बोलावले तरी ती न आल्याने प्रेम तणावात बुडाला. आईच्या मृत्यूनंतर आजीच्या सांभाळात वाढलेल्या प्रेमाची ओढ फक्त पत्नी आणि मुलीची होती. आत्महत्येपूर्वी प्रेमने व्हिडिओ देखील बनवला आहे.
advertisement
ऑडिओ संदेशातील हृदयस्पर्शी शब्द 
प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ पाठवले. त्यात म्हटले, तू जे ऐकून करतेयस, स्वतःच्या पायावर धोंडा मारतेयस. मी किती दिवस फोन करतो, लेकराचं तोंड दाखवत नाहीस. तू आपलं देव सोडून दुसऱ्याकडे जातेयस. आईचं ऐकतेयस, माझ्या शब्दांना मान देत नाहीस. मी या जगात नसणार, लेकराला चांगलं सांभाळ. त्याला वळण लाव. माझ्यात चूक असेल तर पाया पडतो, पण दुसऱ्याचं ऐकू नकोस. माझ्या मातीला येऊ नको! हे शब्द ऐकत नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तरळले. प्रेमच्या पश्चात आजी, भाऊ आणि विवाहित बहीण उरली. रविवारी दुपारी शवविच्छेदनानंतर तालुका पोलिस ठाण्याचे गजानन स्वामी यांनी मृतदेह सोडला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! पत्नीने साथ सोडली, लेकीचं तोंड पाहायलाही आसुसलेल्या बापाने जगाचा घेतला निरोप
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement