advertisement

सूनेनं स्वत:ची नस कापून घेतली, पाहताच सासूचा झटक्यानं मृत्यू; छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: काही वेळातच दोघींमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद उफाळला. वाद वाढत गेल्यानंतर सुनेला राग अनावर झाला.

सूनेनं स्वत:ची नस कापून घेतली, पाहताच सासूचा झटक्यानं मृत्यू; छ. संभाजीनगरात खळबळ (Ai Photo)
सूनेनं स्वत:ची नस कापून घेतली, पाहताच सासूचा झटक्यानं मृत्यू; छ. संभाजीनगरात खळबळ (Ai Photo)
छत्रपती संभाजीनगर: घराघरात सासू-सुनेचे वाद नवे नाहीत. किरकोळ कारणांवरून खटके उडतात, अबोला धरला जातो आणि काही वेळाने पुन्हा सगळे पूर्ववत होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरात अशाच भांडणातून हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बीड बायपास परिसरात कौटुंबिक वादातून सुनेने टोकाचे पाऊल उचलताच 76 वर्षीय सासूचा धक्क्याने मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास भागात राहणाऱ्या एका कुटुंबात मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली होती. राम (नाव बदलले आहे) हे कंपनीत नोकरीस असून ते सकाळी कामावर गेले होते, तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. घरात त्या वेळी केवळ 42 वर्षीय सून आणि 76 वर्षीय सासू होत्या.
काही वेळातच दोघींमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद उफाळला. वाद वाढत गेल्यानंतर सुनेला राग अनावर झाला. संतापाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलत डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ती बेशुद्ध पडली. घरातून आलेली आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, समोर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली सून आणि अचानक जमलेली गर्दी पाहून 76 वर्षीय सासूला जबर धक्का बसला. त्या क्षणातच त्या जमिनीवर कोसळल्या आणि त्यांना शुद्ध आली नाही.
advertisement
शेजाऱ्यांनी दोघींनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. वृद्ध सासूला घाटी रुग्णालयात नेण्यात आले, तर सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सासूचा मृत्यू झाला होता. ब्लेडचा वार खोलवर गेल्याने सुनेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. सुरुवातीला रुग्णालयात वृद्धेला दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली.
सायंकाळी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात 76 वर्षीय सासूचा मृत्यू ‘डेथ ड्यू टू शॉक’ म्हणजेच तीव्र धक्क्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण बीड बायपास परिसरात खळबळ उडाली असून, नात्यांमधील ताणतणावाचे हे विदारक परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सूनेनं स्वत:ची नस कापून घेतली, पाहताच सासूचा झटक्यानं मृत्यू; छ. संभाजीनगरात खळबळ
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement