advertisement

मुलगी का झाली? पतीने फोनवरून उच्चारले ‘ते’ तीन शब्द, पत्नीची पोलिसांत धाव, छ. संभाजीनगरची घटना

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर सासरच्यांनी तिला मारहाण केली. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगितले.

मुलगी का झाली? पतीने फोनवरून उच्चारले ‘ते’ तीन शब्द, पत्नीची पोलिसांत धाव, संभाजीनगरची घटना
मुलगी का झाली? पतीने फोनवरून उच्चारले ‘ते’ तीन शब्द, पत्नीची पोलिसांत धाव, संभाजीनगरची घटना
‎छत्रपती संभाजीनगर : देशात तीन तलाकवर कायदेशीर बंदी असतानाही छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी तलाकचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात शनिवारी (28 जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे.
‎सबा असद खान (वय 24, रा. टाउनहॉल, भडकलगेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा विवाह 11 जून 2023 रोजी असद अय्युब खान (वय 28, रा. सैलाबनगर, नांदेड) याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे दोन ते तीन महिने सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर पती असद आणि सासरे अय्युब यांनी हुंड्याचे उरलेले पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी सुरू केली.
advertisement
‎वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हा पती, सासरे, सासू रेश्मा, दीर अरबाज व सोहेल, नणंद सुमैय्या आणि नंदोई मोहसीन यांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत “जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
advertisement
ऑगस्ट 2024 मध्ये सबा गरोदर असल्याचे समजल्यानंतर सासरच्यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर प्रसूतीसाठी ती माहेरी आली. ‎येथे तिला मुलगी झाली. मात्र यावर पतीने “मला मुलगा हवा होता, मुलगी नको. तू तिकडेच राहा. इकडे आलीस तर तुला जिवंत मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्या वेळेपासून सबा आपल्या आई-वडिलांकडेच वास्तव्यास आहे.
advertisement
दरम्यान, पतीने फोनवरून तीन वेळा “तलाक, तलाक, तलाक” असे म्हणत तिहेरी तलाक दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार गोरखनाथ पवार करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मुलगी का झाली? पतीने फोनवरून उच्चारले ‘ते’ तीन शब्द, पत्नीची पोलिसांत धाव, छ. संभाजीनगरची घटना
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement