हातातला हात सुटला, कुंकवाचा धनी गेला! सुप्रिया ताईंनी सावरलं, पण सुनेत्रा वहिनींचा हुंदका काळजाला आरपार चिरून गेला, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने बारामती व महाराष्ट्र शोकमग्न झाला. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि लाखो नागरिकांनी भावुकपणे अखेरचा निरोप दिला.
"ज्या हातांनी अनेक वर्ष बारामतीचा विकास सावरला, ज्या शब्दांनी अनेकांना उभं केलं, आज तोच आधार कायमचा निखळला होता. अजित दादांच्या पार्थिवाकडे पाहताना केवळ बारामतीकरच नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक डोळा पाणावला होता. पण यात सर्वात जास्त दु:ख पत्नी सुनेत्रा यांच्या वाट्याला आलं. हातातील हात सुटला होता आणि आयुष्याचा जोडीदार कायमचा निघून गेला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हात पाय थरथरत होते, अश्रू थांबत नव्हते, पतीची साथ सुटली या विचारानं मनात काहूर माजला होता. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना सावरलं. अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांना अजित पवार यांच्या पार्थिवाजवळ नेलं. सुनेत्रा पवार यांनी त्यांना शेवटचं पाणी दिलं, नमस्कार केला. घरातला, आयुष्यातला एक सगळ्यात मोठा आधार असलेला माणूस गेला. त्यांना सुप्रिया सुळेंनी सावरलं.
advertisement







