बाप की शैतान? घरात कुणी नव्हतं, पोटच्या लेकीवरच..., न्यायालयाने घडवली जन्माची अद्दल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: वडिलांकडून होणाऱ्या दुष्कृत्याबाबत समजताच पीडितेच्या बहिणीने आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
सोलापूर: बाप-लेकीचं नातं पवित्र मानलं जातं. परंतु, पोटच्या अल्पवयीन लेकीवरच अत्याचार केल्याचा नात्याला काळीमा फासणारा प्रकार सोलापुरात घडला होता. आता याच नराधम बापाला न्यायालयाने जन्माची अद्दल घडवली आहे. जानेवारी 2020 मध्ये घडलेल्या या प्रकरणात विशेष न्यायाधीश बी.एन. सुरवसे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडिता ही अल्पवयीन असून 15 जानेवारी 2020 रोजी घरामध्ये एकटी होती. तेव्हा वडिलांनीच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला घडलेली घटना कोणालाही न सांगण्याबाबत दमदाटी केली. दोन-तीन दिवसानंतर पीडितेची बहीण घराबाहेर जात असतानाच पुन्हा त्याने पीडितेवर अत्याचार केले.
advertisement
वडिलांकडून होणाऱ्या दुष्कृत्याबाबत समजताच पीडितेच्या बहिणीने आईला सांगितले. त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांनी आरोपी नराधम बापास अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
दरम्यान, या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश बी. एन. सुरवसे यांच्यासमोर झाली. या प्रकरणी सात साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपी बापास 20 वर्षे सक्त मजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 11:22 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बाप की शैतान? घरात कुणी नव्हतं, पोटच्या लेकीवरच..., न्यायालयाने घडवली जन्माची अद्दल









