Mumbai News : मुंबईतल्या प्रेमीयुगुलांच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, प्रेयसीवर गुन्हा दाखल
Last Updated:
Mumbai Shocking News : ट्रॉम्बे परिसरातील ही घटना तरुणाच्या प्रेयसीसोबतच्या सततच्या वादामुळे घडली. पोलिस सध्या तपास करत आहेत.
मुंबई : मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात एका तरुणाची प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोघे एकमेकांच्या संपर्कात कसे आले?
अॅन्टॉप हिल येथे राहणारा तरुण आपल्या काकांकडे ट्रॉम्बे येथील चित्ता कॅम्पमध्ये जात होता. त्या वेळी त्याची ओळख 18 वर्षीय तरुणीसोबत झाली. काही दिवसांपूर्वी त्यांचे नाते प्रेमात रूपांतरित झाले होते आणि ते वारंवार भेटत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक दोघांमध्ये वाद सुरु झाला.
नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी तरुण काकांकडे राहण्यासाठी गेला होता. दरम्यान पुन्हा एकदा प्रेयसीसोबत भांडण झाले होते आणि त्या रात्री त्याने हे टोकाचे पाऊल उचलले
advertisement
मोबाईलमधील नोटमुळे प्रकरण उघड
तरुणाच्या आईला त्याच्या मोबाइलमध्ये एक नोट सापडली, ज्यात प्रेयसीसोबतच्या सततच्या वादांचा उल्लेख होता. यावरून तिने ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 10:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईतल्या प्रेमीयुगुलांच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, प्रेयसीवर गुन्हा दाखल







