Astrology: 06 फेब्रुवारीपासून 3 राशींचे दिवस पालटणार; मंगळाच्या नक्षत्रात ग्रहांचा राजा म्हणजे भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ग्रहांचे राशीपरिवर्तन राशीचक्रावर खोल प्रभाव दाखवते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देवाला ध्येय प्राप्ती, साहस, प्रतिभा, नेतृत्व क्षमता, सन्मान, ऊर्जा, आत्मविश्वास, आशा आणि आनंदाचा कारक मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्याच्या चालीत बदल होतो, तेव्हा या सर्व क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो. येत्या 6 फेब्रुवारी रोजी सूर्य श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
advertisement
सिंह - तुमच्यासाठी सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या काळात तुमच्या धाडसात आणि पराक्रमात वाढ होईल. तसेच जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि मानसिक शांतता लाभेल. आर्थिक बाबतीत फायदा होईल आणि मोठ्या गुंतवणुकीत किंवा निर्णयात यश मिळेल. या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मेष राशीच्या लोकांची या काळात वाणी प्रभावशाली राहील, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. संयम आणि विवेकाने घेतलेले निर्णय आर्थिक बाबतीत फायद्याचे ठरतील. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदात जाईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









