अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शरद पवार, जावई सदानंद सुळे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार दाखल
लाडक्या दादांना अखेरचा निरोप
अजित पवार यांना काटेवाडीत शासकीय मानवंदना
अलविदा दादा! लाखोंचा जनसागर… दादा परत या म्हणत आक्रोश
अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाला सुरुवात
राज ठाकरे, शर्मिला ठाकरे काटेवाडीत
अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी
सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
दादांच्या निवासस्थानी काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे अकाली निधनाने मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शोककळा पसरली असून आज येवला, लासलगावचे नागरिक, व्यापाऱ्यानी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून अजितदादाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अनेक कार्यकर्त्यांना आश्रू अनावर झाले काहींनी तर हंबरडा फोडला..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंतयात्रा आज येणार असल्याने बारामती शहर आणि एअरपोर्ट वरती प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला आहे. बारामती शहराच्या बाहेरून एक ते दीड किलोमीटर पर्यंत थांबवण्यात आलेले आहे आणि पर्याय मार्ग मोकळे करून दिले आहे.
अजित पवार यांना अखेरचा निरोप, दादा माणूस गेला, महाराष्ट्र हळहळला
काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी
दादांच्या निवासस्थानी काटेवाडीत नेते, कार्यकर्ते, समर्थक, नातेवाई जमले
दादांचं पार्थिव ९ वाजेपर्यंत काटेवाडी इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र
– राष्ट्रवादी दादा गटाच्या कार्यालयात पार पडली श्रद्धांजली सभा
– “मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाही”
– नागपूरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची भावना
– राष्ट्रवादी दादा गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, आणि पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र
– काल सायंकाळी पार पडली श्रद्धांजली सभा
अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीला रवाना
दादा तुमची वेळ चुकली, अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
सातारा: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव येथे अंत्यसंस्कार
काल बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचे सोबत विदीप जाधव प्रवास करत होते…
रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर त्यांच्यावर झाले अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गदिमा सभागृह येथून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, आता ‘ब्लॅक बॉक्स’ हा तपासाचा मुख्य आधार आहे. लिअरजेट ४५ विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघातापूर्वीची विमानातील यंत्रणा आणि पायलटमधील संभाषण असा डेटा समोर येईल… ज्यामुळे अपघाताचं नेमकं कारण समजू शकणार आहे…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या अकाली एक्झिटनं संपूर्ण राज्यावर
दु:खाचा डोंगर कोसळलाय…विद्या प्रतिष्ठानमध्ये आज सकाळी 11 वाजता दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.. अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्याआधी विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची तोबा गर्दी उसळली आहे. अजित पवारांच्या अपघाती जाण्यानं संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाली आहे.
उद्धव ठाकरेंनी रात्री उशीरा घेतली पवार कुटुंबीयांची भेट… बारामतीमधील निवासस्थानी जाऊन केलं सांत्वन… रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंचीही हजेरी…
फडणवीस आणि शिंदेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली…. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंचं सांत्वन….



