advertisement

Thane Water Cut : पाणी जपून वापरा! ठाण्यात शुक्रवारी पाणीबाणी; कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Last Updated:

Thane Water Supply Shutdown : ठाणे महापालिकेच्या किरवली येथील जलवाहिनी गळतीमुळे शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Thane Water Supply Shutdown
Thane Water Supply Shutdown
ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शुक्रवारी अर्थात उद्या शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा का ठप्प?
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली परिसरात मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. ही गळती थांबवण्यासाठी तसेच इंदिरानगर परिसरातील संपची साफसफाई करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.
कधी अन् किती तास पाणीपुरवठा बंद?
शुक्रवार दिनांक 30 रोजी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 6 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
'या' भागातील नागरिकांनी पाणी मिळणार नाही
घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, रुपादेवी पाडा, किसननगर तसेच सावरकरनगर परिसरातील नागरिकांना ही समस्या जाणवणार आहे. या सर्व भागांमध्ये शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. या काळात काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि उपलब्ध पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Water Cut : पाणी जपून वापरा! ठाण्यात शुक्रवारी पाणीबाणी; कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement